Vasco: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सजली

खास आकर्षण नरकासूर प्रतिमा
Diwali
Diwali Dainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: वास्को येथील बाजारपेठेत दिवाळीसाठी लागणारे विविध साहित्य दाखल झालेले आहे. यात विविध प्रकारची कलाकुसर असलेले आकाशकंदील, नक्षी केलेल्या पणत्या, सजावटीसाठी लागणाऱ्या फुलांच्या माळा, कृत्रिम तोरण तसेच विद्युत रोषणाईसाठी लागणाऱ्या दिव्यांच्या माळा विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्या आहेत.

(In wake of Diwali Vasco's markets flourished )

Diwali
Vasco खारीवाडा येथील जेटी सील; मच्छिमार नाराज

दरवर्षी आकाशकंदील, पणत्या, मिठाई, कपडे तसेच आभूषणे खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी असते. दिवाळीत पणत्या आणि आकाशकंदील यांना खूप महत्त्व आहे. यंदा बाजारपेठेत विविध आकाराचे रंगीबेरंगी आकाशकंदील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याची किंमत साधारणपणे 200 रुपयांपासून सुरू होऊन ते 400, 500 पर्यंत आहे. आकार व दर्जानुसार त्यांचे दर ठरलेले असतात, तसेच पणत्यांचे विविध प्रकार पाहायला मिळत असून त्यात विविध आकाराच्या नक्षीकाम केलेल्या आकर्षक पणत्यांची सध्या चलती आहे.

Diwali
Pernem: मारहाण भोवली; आमदार प्रवीण आर्लेकर यांचा बिनशर्त माफीनामा

बाजारपेठेतील पणत्यांची किंमत 80 रुपयांपासून सुरू होते. तर काहींची 100 रुपये डझन अशा दराने विक्री होत आहे. त्याचप्रमाणे सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या माळा, तोरण यांचा वापर केला जातो. साधारण माळांची किंमत 70 रुपयांपासून सुरू होऊन 400, 500 रुपयांपर्यंत जाते. त्याची किंमत वाढत चाललेली असली तरी नागरिक दिवाळी साजरी करण्यास मागे राहत नाही. दिवाळी पूर्वसंध्येचे खास आकर्षण म्हणजे नरकासूर प्रतिमा दहन करणे, त्यासाठी अनेक भागांतील युवक नरकासूर प्रतिमा तयार करण्यात मग्न झाले आहेत.

वास्को येथील बाजारपेठेवर दिवाळीचा साज चढला आहे. आकाशकंदील तसेच विद्युत रोषणाईने बाजारपेठ लखलखू लागली आहे. लोकांचीही पावले खरेदीसाठी वळू लागली आहेत. बाजारपेठात आकाशकंदील, रोषणाईच्या माळा, पणत्या, सजावटी साहित्य मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सध्या बाजारात विशेष गर्दी नसली तरी येत्या तीन-चार दिवसांत बाजारपेठा गर्दीने फुलण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com