Goa Crime News: लोलयेतील चोरी प्रकरणी दोघा चोरट्यांना अटक

तामने-लोलये येथील घरांत दिवसा ढवळ्या चोरी केलेल्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
In the theft case at lolaye Two thieves arrested
In the theft case at lolaye Two thieves arrestedDainik Gomantak

Goa Crime News: तामने-लोलये येथील घरांत दिवसा ढवळ्या चोरी केलेल्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तामने- लोलये येथील पांडुरंग पागी यांच्या घरांत दिवसाढवळ्या घुसून अज्ञात चोरट्यांनी रोकड व सोन्याचे दागिने लंपास केले. ही चोरी गुरूवारी दुपारी झाली होती.

सोमवारी या संशयित दोन चोरट्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशीसाठी तीन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाकडून मागून घेतली आहे. आत्तापर्यंत चोरट्यांनी चोरलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले असल्याचे काणकोणचे पोलिस उपअधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी सांगितले.

In the theft case at lolaye Two thieves arrested
Goa Crime News: फोंड्यात क्रेनने मोटारसायकल पायलटला चिरडले; चालक अटकेत; गरीब कुटुंबाने गमावला आधारस्‍तंभ

दिवसाढवळ्या हा चोरीचा प्रकार घडला तरी संध्याकाळी उशिरा पांडुरंग पागी व त्यांची पत्नी कामावरून घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हे दांपत्य कामानिमित्त चावडी-काणकोण येथे गेले होते, त्यांचा पुत्र उच्च माध्यमिक विद्यालयात गेला होता.

In the theft case at lolaye Two thieves arrested
Goa Crime News: पर्वरीत क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा; गुजरातच्या तिघांना अटक, 10 लाखांचे साहित्य जप्त

या चोरीत त्यांच्या घरातील ४० हजार रोख रक्कम व दागिने चोरून नेले होते. त्यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले. प्राप्तमाहितीनुसार चोरटा एका मोटारसायकलवरून आला होता. त्याने हेल्मेट परिधान केले होते, असे त्यांच्या काही शेजाऱ्यानी सांगितले. त्यावरून पोलिसांनी पैंगीण बाजारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com