Ram Mandir Ayodhya: येत्या 3 वर्षात सत्तरी-उसगावकरांना अयोध्या दर्शन घडवणार! विश्वजित राणेंची माहिती

तीन वर्षात ते सत्तरी आणि उसगावमधून 15 हजार लोकांना अयोध्येला पाठवणार
Ram Mandir Ayodhya
Ram Mandir AyodhyaDainik Gomantak
Published on
Updated on

Ram Mandir Ayodhya: अयोध्यानगरीत काल (सोमवारी) प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. यावेळी संपूर्ण देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गोवेकरांना अयोध्यावारी घडवणार असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केले आहे.

Ram Mandir Ayodhya
Ponda Police Station: फोंडा पोलीस स्थानकाला शववाहिकाच नाही! पोलिसांच्या तपासकामात अडथळा

आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, येत्या तीन वर्षात ते सत्तरी आणि उसगावमधून 15 हजार लोकांना अयोध्येला पाठवणार आहेत.

प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सत्तरी आणि उसगावमध्ये 1,000 हून अधिक गोवेकरांनी काल वाळपई येथील मैदानावर 55,000 दिवे प्रज्वलित केले होते. यामुळे सर्वत्र दिवाळीचे वातावरण होते.

मंत्री राणे पुढे म्हणाले की, प्रभू रामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा सत्तरी आणि उसगावकरांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. प्रत्येकाला आता अयोध्येत जाणे शक्य नसले तरी पुढील 3 वर्षात अयोध्या दर्शन घेणे शक्य होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com