Goa Weather Update: राज्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस; मॉन्सूनचा सुधारित अंदाज

देशात सरासरीच्या ९३ टक्के पावसाची शक्यता
Goa Weather Update
Goa Weather UpdateDainik Gomantak

यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात देशात सरासरी इतक्या (96 टक्के) पावसाची शक्यता आहे. तर राज्यात जून महिन्यात यंदा सरासरीच्‍या तुलनेत कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मॉन्सूनच्या सुधारित अंदाजात म्हटले आहे.

‘आयएमडी’तर्फे शुक्रवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हवामानशास्त्र विभागाच्या वातावरणीय देखरेख आणि संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. डी. एस. पै यांनी ही माहिती दिली. यावेळी मॉन्सूनचा सुधारित दीर्घकालीन अंदाज जाहीर करण्यात आला.

त्यानुसार यंदा जून ते सप्टेंबर (मॉन्सून काळात) दरम्यान देशात सरासरीच्या ९३ टक्के पावसाची शक्यता असून त्यात चार टक्के कमी-जास्त तफावत असू शकते. तर मॉन्सूनवर अवलंबून असलेल्या भागात ९४ ते १०६ टक्के इतक्या सरासरीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Goa Weather Update
Goa Traffic Rule: वाहतूकीचे नियम मोडाल तर इतका होईल दंड; वाहतूक विभागाने जाहीर केली यादी

सरासरी म्हणजे किती पाऊस?

सरासरी पावसाची स्थिती पाहता १९७१ ते २०२० या कालावधीत देशात मॉन्सून काळात सरासरी ८६८.६ मिलिमीटर पाऊस पडतो. तसेच सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस हा सर्वसाधारण गृहित धरला जातो. परंतु सुधारित अंदाजानुसार या वर्षी मॉन्सून हंगामात सरासरी पाऊस पडण्याची शक्यता ४३ टक्के आहे. जी सर्वाधिक अशी मानली जाते. दरम्यान, जून महिन्यात मात्र देशाच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता कमी राहील, असे नमूद करण्यात आले आहे.

पावसाचा अंदाज (टक्क्यांत)

मध्य भारत : ९४ ते १०६

ईशान्य भारत : ९४ ते १०६

वायव्य भारत : ९२

दक्षिण भारत : ९४ ते १०६

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com