Colvale Jail: कोलवाळ कारागृहात पुन्हा भडकले टोळीयुद्ध

तुरुंगरक्षक, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे प्रकरण नियंत्रणात : पूर्ववैमनस्यातून टारझन-कार्बोटकर गटामध्ये राडा
Gangwar in Colvale Jail
Gangwar in Colvale Jail Dainik Gomantak
Published on
Updated on

Gangwar in Colvale Jail कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात आज, मंगळवारी सकाळी पुन्हा टारझन व कार्बोटकर या कैद्यांच्या दोन गटांत पूर्ववैमनस्यातून राडा झाला. यावेळी तुरुंगाधिकारी आणि पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने हे प्रकरण चिघळले नाही.

तुरुंगातील या प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे. कारागृह महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई यांनी या घटनेचा अहवाल तुरुंग अधीक्षकांकडून मागविला आहे.

Gangwar in Colvale Jail
New Mantralaya At Porvorim: गीता पठण, विधिवत पूजनाने भव्यदिव्य मंत्रालयाचे उद्‌घाटन

काही वर्षांपूर्वी या कारागृहात अट्टल गुन्हेगार अश्‍पाक बेंग्रे तसेच कारबोटकर यांचा खून झाला होता. त्यावेळी झालेल्या टोळीयुद्धामध्ये कारागृहातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून तसेच कारागृहात काळोख करून बेदम मारहाण केल्याने त्यांच्या मृत्यू झाला होता.

या कारागृहात तेथील साधनसुविधा वापरण्यावरून दोन टोळ्यांमध्ये वाद आहेत. त्यामुळे त्यांच्यात असे वारंवार खटके उडत असतात. तुरुंगाधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी करून दोन्ही गटांना ताकीद दिली.

Gangwar in Colvale Jail
Goa Traffic Rule: वाहनचालकांनो, सावध व्हा! अन्यथा घरी तालांव

वर्चस्ववादातून तंटे :

काही कैदी स्वतःचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करतात. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कैद्यांनी आपल्या टोळ्या बनवून त्या सक्रिय केल्या आहेत. आपले वर्चस्व ठेवण्यावरून त्यांच्यात वाद तसेच हाणामाऱ्या होत असल्याने तेथील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे.

नेमके काय झाले?

टारझन टोळीतील काही कैद्यांना न्यायालयात जायचे असल्याने ते तयारी करत होते. याचवेळी कारबोटकर गटातील काही कैदी आले. त्यांनी टारझन गटाशी वाद सुरू केला. त्यांच्यातील बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले.

प्रशासन हतबल

कारागृहातूनच काही अट्टल गुन्हेगार बाहेरील जगताशी संपर्क साधून हप्तेवसुली करतात. त्यामुळे कारागृह सुरक्षा यंत्रणाही हतबल झाली आहे. तेथील गुन्हेगारांना नियंत्रणात ठेवणे तुरुंगाधिकाऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com