Goa Traffic Rule: वाहनचालकांनो, सावध व्हा! अन्यथा घरी तालांव

उद्यापासून 13 ठिकाणी सीसीटीव्हीची नजर
Traffic rules
Traffic rulesDainik Gomantak

Goa Traffic Rule: राज्यात दरवर्षी रस्ते अपघातांत मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चालकांमध्ये नियमांविषयी जागृती करूनही हे प्रमाण कमी होत नाही.

त्यामुळे पणजी शहर व आजूबाजूच्या परिसरात 1 जूनपासून 13 ठिकाणी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.

कारवाईचे चलन त्यांच्या व्हॉट्स ॲप क्रमांक किंवा घरच्या पत्त्यावर पाठवले जाणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन वाहतूक खात्याने केले आहे.

पणजीतील वाहतूक सिग्नलच्या ठिकाणी अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थापन पद्धत (आयटीएमएस) बसविली आहे.

या सिस्टीममध्ये वाहनचालकाने सिग्नल तोडल्यास, हेल्मेट नसल्यास, सीटबेल्ट लावला नसल्यास, ओव्हर स्पिडिंग, दुचाकीवर दोनपेक्षा अधिकजण स्वार, ओव्हरटेकिंग केल्यास याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून चित्रीकरण होणार आहे.

जो कोणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करील, त्याचा वाहन क्रमांक टिपण्याचेही काम ही यंत्रणा करणार आहे.

केंद्रीय मोटार वाहन कायद्यात केलेल्या दुरुस्तीनुसार विविध प्रकारच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईच्या रक्कमेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. हेल्मेट न वापरल्यास पूर्वी 100 रुपये दंड होता तो आता दहापटीने वाढवून एक हजार रुपये केला आहे.

Traffic rules
Dabolim Airport: वर्षभरात 83 लाख प्रवाशांकडून दाबोळी विमानतळाचा वापर; 348 चार्टर उड्डाणे

वाहतूक सिग्नल तोडणे, फॅन्सी वाहन क्रमांक, मालवाहू वाहनात प्रवासी नेणे, ओव्हरटेक करताना इतरांना गैरसोय किंवा अडथळा आणणे, अनधिकृत ठिकाणी वाहन पार्किंग करणे या पहिल्या गुन्ह्यासाठी 500 रुपये दंड आहे.

त्यानंतर नोंद होणाऱ्या गुन्‍ह्यासाठी एक हजार रुपये दंड आहे. ज्या वाहनाविरुद्ध एकदा कारवाई झाली, त्याची नोंद वाहतूक खात्याकडे होईल. त्यामुळे दुसरा गुन्हा ओळखण्यास मदत होणार आहे. दुचाकीवर दोनपेक्षा अधिकजणांना बसवण्यास 1 हजार रुपये दंड आहे.

Traffic rules
Goa Petrol-Diesel Price: देशात इंधनाचे भाव जैसे थे, गोव्यातील पेट्रोल - डिझेलचे दर जाणून घ्या

रस्त्यावर आपत्कालीन वाहनांना (रुग्णवाहिका व अग्निशमन वाहन) वाट मोकळी करून देण्यास एखाद्या वाहनचालकाने अडथळा आणल्यास 10 हजार रुपयांचा दंड आहे.

ओव्हर स्पिडिंगसाठी 1 हजार तर विनापरवाना चालकाला 2 हजार रुपये दंड आहे. वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्यास 1 हजार रुपये दंड आहे. मात्र, दुसऱ्या गुन्ह्यासाठी ही दंडाची रक्कम दहापटीने वाढवून 10 हजार रुपये केली आहे.

फलक पहा, पुढे जा!

पणजीतील वाहनांच्या वेगमर्यादेसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. ही वेगमर्यादा विविध परिसरासाठी वेगवेगळी आहे. कमीत कमी 40 किलोमीटर प्रतितास ते 60 किलोमीटर प्रतितास ठेवली आहे.

त्याचे फलकही रस्त्याच्या बाजूने लावले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना या फलकांकडे पाहत वाहन चालवावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com