Crime News : वेश्‍‍याव्‍यवसाय प्रकरणातील आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्‌ध्‍वस्‍त; ईडीची कारवाई

Crime News : विदेशी युवतींची गोव्‍यात तस्करी
Crime
Crime Dainik Gomantak

Crime News : पणजी, सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) गोवा विभागाने केलेल्या कारवाईतून एका केनियन नागरिकाला अटक केल्यानंतर भारतात नोकरीचे आमिष दाखवून विदेशी युवतींची तस्करी करून त्यांना वेश्‍याव्यवसायात ढकलण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

हणजूण पोलिसांनी केलेल्या कारवाईत २३ वर्षांच्या दोन केनियन युवतींची सुटका करताना एक हॉटेल व्यवस्थापक व तीन विदेशी नागरिकांसह चौघांविरोधात मानवी तस्करी व वेश्‍याव्यवसायप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

वेश्‍याव्यवसाय आंतरराष्ट्रीय रॅकेटप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे विल्किता आचिस्टा, इस्रायली ऊर्फ डोर कास्ट मारिया, न्यूटन मुथुरी किमानी अशी आहेत. काल मध्यरात्री ही कारवाई करण्‍यात आली. वेश्याव्यवसाय प्रतिबंधक कायद्याखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या पीडित विदेशी युवतींच्या जबान्या नोंदवण्यात येत आहेत.

Crime
Goa Crime: बँकेच्या लॉकरमधून आणलेले सोन्यावर चोरट्यांचा डल्ला; म्हापशात फ्लॅट फोडून पळवला 17 लाखांचा ऐवज

‘ईडी’च्‍या अधिकाऱ्यांनी केनियन नागरिक न्यूटन किमानी याला मानवी तस्करीप्रकरणी अटक केली होती. तो भारतात विद्यार्थी म्‍हणून व्हिसावर राहत होता. इस्रायली ऊर्फ डोर कास्ट मारिया व ओलोक्पा यांच्‍याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

त्यांची चौकशी करताना या आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. संशयित न्यूटन हा आफ्रिकन मुलींना भारतात हॉटेल उद्योगातील नोकरीचे आमिष दाखवून आणायचा आणि त्यांची तस्करी करून जबरदस्तीने वेश्‍याव्यवसायात ढकलायचा.

‘एम-पैसा’ ॲपने पैसा जातो विदेशात

केनियन नागरिक न्यूटन मुथुरी किमानी याची चौकशी केली असता तो विविध बँक खाती हाताळतानाच अनेक लोकांच्या बँक खात्यांवर पैसे जमा करत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. त्‍यामुळे या आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटमध्ये अनेकजण गुंतले असण्याची शक्यता आहे.

वेश्‍याव्यवसायातून जमा होणारा पैसा केनिया व इतर देशांत ‘एम-पैसा’ ॲपने पाठवण्यात येत होता. तसेच काही विदेशी बँकांतही हवाला मार्गाने हा पैसा वळविला जात असल्याचे आढळून आले आहे.

अशा प्रकारची आणखीही आंतरराष्‍ट्रीय रॅकेट्‌स कार्यरत असण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे सर्व बाजूंनी सध्‍या तपासाची चक्रे फिरविली जात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com