Goa Crime: बँकेच्या लॉकरमधून आणलेले सोन्यावर चोरट्यांचा डल्ला; म्हापशात फ्लॅट फोडून पळवला 17 लाखांचा ऐवज

16 लाखांच्या दागिन्यांचा समावेश; भरदिवसा घरफोडी
Goa Crime Mapusa Theft:
Goa Crime Mapusa Theft:Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime Mapusa Theft: गणेशपुरी-म्‍हापसा येथील ‘विनायक निवास’ या अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा फोडून सोन्याचे दागिने व एक लाखाची रोकड असा एकूण १७ लाखांचा ऐवज लंपास केला.

ही घटना आज गुरुवारी दुपारी सव्‍वादोन ते सव्‍वातीनच्‍या सुमारास घडली. दिवाळीला बँक लॉकरमधून आणले होते.

मिळालेल्‍या माहितीनुसार, हा फ्लॅट फिर्यादी सतीश भुपाली (वय ३८) यांचा असून चोरीच्‍या घटनेवेळी घरात कोणीच नव्‍हते. भुपाली हे पत्नीला मुलीच्या शाळेत सोडण्यासाठी गेले होते. तेव्हा घरात कुणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी डाव साधला.

Goa Crime Mapusa Theft:
Goa ED Arrest: 'ईडी'ने गोव्यात केनियन नागरिकाला केली अटक; हणजुणमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

संशयित चोरट्यांनी फ्लॅटचा मुख्य दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. बेडरूममधील कपाटमधील १५ ते १६ लाख रुपयांचे सुवर्णालंकार व १ लाख रुपयांची रोकड मिळून १७ लाखांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले.

याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.दं.सं.च्या कलम ४५४, ३८० अन्वये गुन्हा नोंद केला.

Goa Crime Mapusa Theft:
Goa Government Hotels: स्वस्तात गोवा ट्रिप करायचीय? मग 'या' सरकारी हॉटेल्समध्ये करा बुकिंग

लॉकरमधून आणले होते सुवर्णालंकार...

सतीश भुपाली यांचे म्हापशात भुसारीचे दुकान आहे. त्यांनी दागिने बँकेच्या लॉकरमधून दिवाळीनिमित्त घरात आणून ठेवले होते. तसेच आता मार्गशीर्ष महिना लागल्याने त्यांनी हे सोन्याचे दागिने परत लॉकरमध्ये न ठेवता, घरीच ठेवले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com