सत्तास्थापनेसाठी काँग्रेसने गोव्यातील उमेदवारांच्या 'वन-टू-वन' बैठका घेतल्या

हालचालींना वेग: बहुमत मिळाले तरीही मगोप आमच्‍या बाजूने
Congress Meeting
Congress Meeting Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: विधानसभा निवडणुकीची मतमोजणी जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसा सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येऊ लागला आहे. काँग्रेसने आज पणजीत आपले उमेदवार आणि त्यांचे निवडणूक एजंट यांची बैठक घेत मतमोजणीबाबत महत्त्‍वपूर्ण सूचना केल्‍या.

मतमोजणी योग्य पद्धतीने होतेय की नाही याकडे लक्ष देण्याबरोबरच सत्तास्थापनेसाठी करावयाच्या प्रयत्नांची माहिती दिली.

Congress Meeting
साखळीत 5 हजार मतांनी विजयी होणार; मुख्यमंत्री सावंत यांचा दावा

साखळीत 5 हजार मतांनी विजयी होणार; मुख्यमंत्री सावंत यांचा दावापणजी येथील निवडणूक कार्यालयात काँग्रेसने आज उत्तर गोव्यातील उमेदवारांच्या वन-टू-वन बैठका घेतल्या. पक्षाचे प्रभारी पी. चिदंबरम आणि दिनेश गुंडू राव यांच्या उपस्थितीत या बैठका पार पडल्‍या. यानंतर दक्षिण गोव्यातील उमेदवारांच्‍या बैठका मडगाव येथे होणार आहेत, अशी माहिती पक्षाचे कार्यालयीन सचिव एम. के. शेख यांनी दिली आहे.

Congress Meeting
पर्यटकांसाठी खुशखबर; गोव्यातील कसिनो पूर्ण क्षमतेने उघडणार

या निवडणुकीत काँग्रेसला 2017 सालापेक्षा जास्‍त जागा मिळतील आणि काँग्रेस पक्ष बहुमतांनी सत्तेत येईल, असा आम्‍हाला ठाम विश्‍वास आहे. तरीही भाजप विरोधकांनी एकत्रित यावे असा आमचा आग्रह असून मगोप काँग्रेससोबतच असेल, असे माजी मंत्री आणि काँग्रेसचे कळंगुटचे उमेदवार मायकल लोबो यांनी सांगितले.

भाजपविरोधकांनी एकत्रित यावे: दिनेश गुंडू राव

ही निवडणूक भाजप विरोधात सर्व अशीच होती. आता निवडणुकीनंतर सर्व विरोधकांनी एकत्र येणे हे राज्‍याच्‍या हिताचे आहे. जरी काँग्रेसला बहुमत मिळाले तरीही सर्व विरोधकांनी सत्तेत एकत्र यावे असे काँग्रेसला वाटत आहे. त्‍यामुळे सर्व भाजप विरोधक एकत्रित येतील. यासंदर्भात तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने तातडीने निर्णय घ्‍यावा, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com