मडगाव: नेहमीच अशांत राहणाऱ्या सासष्टी तालुक्यात पुन्हा एकदा आंदोलकांत खदखद सुरू झाली आहे. सांकवाळच्या भूतानी प्रकल्पावरून सुरू झालेला हा वाद आता पुन्हा आंदोलनाच्या रूपात पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (आरपी) प्रादेशिक आराखड्यावरून गाेव्यात पुन्हा एकदा आंदोलन सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्याचे केंद्रस्थान सासष्टीच असण्याचे स्पष्ट संकेत दिले जात आहेत.
‘मेंबर आॅफ सिव्हील सोसायटी’ या बॅनरखाली बुधवारी चिंचोणे येथे गोव्यातील आंदोलकांनी येऊन निदर्शने केली. वास्तविक यासाठी चिंचोणेच्या नागरिकांनी पुढाकार घेतला हाेता. यावेळी लोकांच्या संमतीने नवीन प्रादेशिक आराखडा तयार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
सांकवाळ येथील भूतानी प्रकल्प, तसेच कुडतरीत होत असलेली डाेंगरकापणी या मुद्यांभोवती जरी सध्या लोकांत चर्चा चालू असली तरी गोव्यातील जमीन परप्रांतीयांच्या घशात जाणे चालू आहे, या मुद्यावर लोक जास्त भयभीत झाल्याचे चिंचोणे येथील निदर्शनात दिसून आले. या सभेत जमिनी परप्रांतीयांना कुणी विकू नयेत, असा ठरावही घेतला.
वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांनीही हे आंदोलन पूर्ण राज्यात नेण्याचा आपला निश्चय व्यक्त केला. ते म्हणाले, इथल्या जमिनी जर बाहेरच्या लाेकांच्या घशात गेल्या तर गोवेकर स्वत:च्याच भूमीवर अल्पसंख्य होतील.
गोव्याची जर कुणी वाट लावली असेल तर ती आमच्या राजकारण्यांनी, असा दावा करून आता त्यावर जर उपाय हवा, तर गोव्यातील लोकांनीच आक्रमक बनण्याची गरज आहे, असे पर्यावरण चळवळीतील नेते क्लाॅड आल्वारिस यांनी सांगितले. ते म्हणाले, गोव्यातील लोकांनी जनरेट्याद्वारे यापूर्वी सरकारला नमवले आहे आणि यापुढेही तसे करणे शक्य आहे. ड्यूपाँटसारख्या उद्याेग समूहाचा प्रकल्प लोकआंदोलनामुळेच बंद पडला. जनरेट्यामुळे १५ असे प्रकल्प सरकारला रद्द करावे लागलेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.