गोव्यात पेट्रोल 103.60 तर डिझेल 93.73

महागाई: 11 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7.40 रुपयांची वाढ
पेट्रोल-डिझेल
पेट्रोल-डिझेलDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: क्रूड ऑइलच्या आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये वाढ होत असल्याचे कारण देत देशातील पेट्रोलियम कंपन्या रोज 80- 80 पैशांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये दरवाढ करत आहेत. या रोजच्या दरवाढीने नागरिक हैराण झाले असून गेली अकरा दिवस सलग दरवाढ होत आहे. 11 दिवसांमध्ये 7 रुपये 40 पैशाने ही दरवाढ झाल्याने विरोधी पक्षानेही केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. दरवाढीविरोधात विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा ''गोमन्तक''शी बोलताना दिला आहे.

पेट्रोल-डिझेल
म्हापशात जमीन घोटाळा; संशयितारोधात लूकआउट नोटीस

शनिवारी, ता. 2 रोजी पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर आणखी 80 पैशांनी महागले. गोव्यात पेट्रोल सरासरी 103.60 रुपये प्रतीलिटर इतके असून डिझेलचा भाव 93.73 रुपयांवर पोहोचले आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव वधारल्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होत असून यामुळे महागाईही वाढत आहे. सध्या राज्यात मात्र, इंधन दरवाढ ही क्रुड ऑईलच्या आंतरराष्ट्रीय किंमतीशी संबंधित असलेली बाब आहे. त्यामध्ये केंद्र सरकारचा हस्तक्षेप नाही असे कारण सत्ताधारी पक्षाच्या वतीने सांगण्यात येत आहे. तरी पेट्रोल आणि डिझेलवर लावलेला अधिभार, विविध प्रकारचे कर आणि जीएसटी कमी करून इंधनाच्या वाढत्या किंमती नियंत्रणात ठेवणे शक्य आहे अशी टीका विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी केली आहे.

पेट्रोल-डिझेल
गोवा खातेवाटप: मुहुर्ताला नाराजीचे ग्रहण

क्रुड ऑइल आणि इंधन वाढीचा संबंध असला तरी केंद्र आणि राज्य सरकारच्या डबल इंजिनने लावलेले अधिभार, कर आणि जीएसटी यामुळे इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे दोन्ही सरकारने लावलेले अधिभार कमी केल्यास इंधन दरवाढ नियंत्रणात राहू शकेल.

- मायकल लोबो

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com