म्हापशात जमीन घोटाळा; संशयितारोधात लूकआउट नोटीस

सुलेमान खान याच्या विरोधात म्हापसा पोलिसांनी लूक आउट नोटीस जारी केली आहे.
Mapusa Police
Mapusa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: बनवाटगिरी करून एकतानगर-म्हापसा येथील जमीन स्वत:च्या नावे करून संबंधित व्यक्तीची फसवणूक केल्याच्या प्रकरणी या गुन्ह्यातील फरारी असलेला संशयित सिद्धिकी ऊर्फ सुलेमान खान याच्या विरोधात म्हापसा पोलिसांनी लूक आउट नोटीस जारी केली आहे. संशयिताचे वास्तव्य सध्या माडेल-थिवी येथे आहे.

एकतानगर हाऊसिंग बोर्ड येथील जमीन येथील उपनिबंधकांच्या बनावट रबरी शिक्क्याचा वापर करून बनावट कागदपत्रे कायदेशीर असल्याचे भासवले व संशयित सिद्धिकी सुलेमान याने इतर संशयितांच्या साहाय्याने उपनिबंधक कार्यालयाकडून जमीन स्वतःच्या नावावर केली होती. एप्रिल 2020 पूर्वी ही घटना घडली होती.

Mapusa Police
नार्वेत ‘कोको’ देवाची जत्रा प्रचंड उत्साहात

त्या जमिनीतील जुने घर जमीनदोस्त करून संशयिताने तिथे नवे बांधकाम सुरू केले होते. ही जमीन लीना डिसोझा यांच्या नातेवाईकाची होती. हा प्रकार जमिनीच्या वारसदार डिसोझा यांच्या निदर्शनास येताच त्यांनी या माहिती हक्क कायद्यांतर्गत अर्ज करून उपनिबंधक कार्यालयाकडून माहिती मिळवली होती. त्या माहितीनुसार, संशयिताने उपनिबंधकांचा बनावट रबरी शिक्का तयार केला व वर्ष 1997 मधील मूळ जमीन विक्रीपत्रातील कागदपत्रांमध्ये फेरफार केली आणि मूळ मालकांची नावे गाळून कुणीतरी स्वत:ची नावे चढवली असल्याचे त्यांना आढळून आले.

Mapusa Police
बोरीत कँटरची ट्रकला धडक; चालक गंभीर

तत्कालीन उपनिबंधक अर्जुन शेटये यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी 19 सप्टेंबर 2020 रोजी संशयितांविरोधात गुन्हा नोंदवला होता. चौकशीत हा बनावटगिरीचा प्रकार सिद्धिकी ऊर्फ सुलेमान खानने केल्याचे उघड झाले होते. थांगपत्ता लागत नसल्याने पोलिसांनी संशयिता विरोधात 31 मार्च रोजी लूकआऊट नोटीस जारी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com