Goa: होय,आम्हालाही हवी सौरऊर्जा

आणखी शंभर जणांचे अर्ज,आजवर १५१ घरांमध्ये पेटले विजेविना दिवे ,ग्रामीण भागांमधून वाढतोय कल
वीज दिव्यांचा प्रकाश (Lighting of electric lamps) पडू न शकणारी 151 घरे प्रकाशमय झाली.
वीज दिव्यांचा प्रकाश (Lighting of electric lamps) पडू न शकणारी 151 घरे प्रकाशमय झाली. Dainik Gomantak
Published on
Updated on

अवित बगळे/पणजी: गोवा (Goa) मुक्तीचे साठावे वर्ष उजाडले आणि कधी वीज दिव्यांचा प्रकाश (Lighting of electric lamps) पडू न शकणारी 151 घरे प्रकाशमय झाली. हे पाहून आता आणखीन शंभर घरमालकांनी आपल्यालाही सौरऊर्जा (Solar energy) मिळावी यासाठी सरकारकडे अर्ज केले आहेत.

एका बाजूने सरकारने गोवा ऊर्जा विकास यंत्रणेच्या (Goa Energy Development System) माध्यमातून हे काम हाती घेतले आहे, तर दुसऱ्या बाजूने सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने अनेकांची घरे उजळवून टाकण्यात हातभार लावला आहे. आता ग्रामीण भागात काही परिसरात केवळ एकेक घर असल्यामुळे वीज खात्याने खर्च करण्यासाठी हात आखडता घेतल्यामुळे या घरमालकांनी सौरउर्जेसाठी अर्ज केले आहेत. सरकारने योजना लागू करण्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणातही या घरांची गणती करण्यात आली नव्हती हे विशेष.

वीज दिव्यांचा प्रकाश (Lighting of electric lamps) पडू न शकणारी 151 घरे प्रकाशमय झाली.
Goa: ६० वर्षानंतर तेरेखोल गावाला होणार गोव्यातून वीज पुरवठा

दरम्यान, योगायोगाने पुढील वर्षी जानेवारी- फेब्रुवारीत विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे समाजसेवेची पोचपावती यामुळे अनेकांनी सौरऊर्जा दुर्गम भागापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तुये येथील धनगरवस्तीपर्यंत कॉंग्रेसचे कार्यकर्ते सचिन परब यांनी सौरऊर्जा पोचवली. डिचोलीचे माजी आमदार नरेश सावळ यांनी दोडामार्ग परिसरातील तीन घरे सौरउर्जेने सरकारी योजनेतून प्रकाशमान केले. राज्य सरकारने ग्रामीण ग्राम विद्युतीकरण नावाने एक योजना तयार केली. वीज पोचू शकणार नाही अशा घरांचे सर्वेक्षण केले आणि त्यांना पूर्णतः मोफत सौरऊर्जा देण्याची योजना मार्गी लावली.

वीज दिव्यांचा प्रकाश (Lighting of electric lamps) पडू न शकणारी 151 घरे प्रकाशमय झाली.
Goa वीज खात्याचा अजब-गजब कारभार

तीन ट्यूबलाईट, एक पंखा, मिक्सरही चालतो बरं का...

या योजनेतून प्रत्येक घराला तीन ट्यूबलाईट, एक पंखा, मिक्सर आदी उपकऱणे चालवण्यासाठी तीन प्लग, मोबाईल चार्जर लावण्याची सोय, पाच वर्षे वॉरटी असलेली बॅटरी व यंत्रणा दिली जात आहे. पाच वर्षे या योजनेतून बसवण्यात आलेल्या सौरऊर्जा उपकरणाची देखभाल व दुरुस्ती पाच वर्षांपर्यंत करण्यात येणार आहे. यासाठी पंचायत पातळीवर निधी सरकारकडून उपलब्ध करण्याची योजना आहे.

ज्या भागात खांब टाकून वीज जोड देणे शक्य नाही अशा भागात वीज पुरवण्यासाठी ही योजना उपकारक ठरत आहे. आता नव्याने शंभर घरमालकांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज केले आहेत. त्यांचे अर्ज सध्या विचाराधीन आहेत.

- संजीव जोगळेकर, सदस्य सचिव, गोवा ऊर्जा विकास यंत्रणा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com