भाजपा सरकार आणि पक्ष सदैव जनहित लक्षात घेवून जनकल्याण करणाऱ्या योजना राबवत असल्याने जनतेने याच्याही पुढे भाजपला साथ देण्याचे आवाहन करून, ६० वर्षानंतर तेरेखोल गावाचा अंधार भाजपा सरकार दूर करणार, त्याना राज्यातून वीज पुरवठा होणार असे उद्गार मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद (CM Dr Pramod Sawant) सावंत यांनी काढले.
गोवा मुक्त होवून 60 वर्षे झाली, मात्र तेरेखोल गावासाठी राज्यातून विजपुरवठा होत नव्हता, आता 60 वर्षानंतर राज्यातून वीज पुरवठा कण्यासाठी तेरेखोल नदीतून भूमिगत केबल घालून वीज पुरवठा केला जाणार आहे. त्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आमदार दयानंद सोपटे यांच्या उपस्थितीत २४ रोजी करण्यात आला. एकूण साडेचार कोटी खर्च करून केबल घालण्याचा कामाचा शुभारंभ केल्यानंतर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी सरपंच सुरज नाईक, उपसरपंच सौ. शिरगावकर, माजी सरपंच रत्नाकर हरजी, सुरेश नाईक, आग्नेलो गुधीन्हो, नमिता केरकर, पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब, दीपा तळकर, अनिशा केरकर, हरमल माजी सरपंच अनंत गडेकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी बोलताना हा काळ निवडणुकीचा नाही, मात्र भाजप हा सदोदित जनसंपर्कात असतो, त्याचा एक भाग म्हणून आज भाजपा मांद्रे मतदार संघाचा दौरा करत असताना नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्याचेही काम करीत असल्याचे सांगून येत्या निवडणुकीत काम करणाऱ्या भाजपा सरकारला साथ द्यावी असे आवाहन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केले.
विकासासठी साथ द्या; आमदार सोपटे
आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना यापूर्वीच्या आमदारांनी तेरेखोल गावाकडे माणुसकीच्या नजरेतून पाहिले नाही, राज्यातून त्याना वीजपुरवठा व्हावा यासाठी कधी प्रयत्न केले नाही. आपण आमदार असताच वीज मंत्री निलेश काब्राल याना घेवून तेरेखोल गावात आलो , लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडे चर्चा केल्यानंतर आता भूमिगत वीज वाहिन्या घालण्यासाठी मंजुरी मिळाली व कामाला सुरुवात झाली त्याबद्दल समाधान व्यक्त केले. जनतेने विकासासाठी साथ देण्यचे आवाहन केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.