गोव्यात आठ मंत्री मूळ काँग्रेसचे; तरीही केंद्राची पसंती

88 टक्के मंत्री काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले
In Goa eight ministers belong to original Congress
In Goa eight ministers belong to original Congress Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: 90 च्या दशकात काँग्रेससाठी आमदार आणि मंत्र्यांचा पुरवठा करणारा पक्ष म्हणून मगोपकडे पाहिले जायचे. आता मगोपची जागा काँग्रेस पक्षाने घेतली आहे. याचे कारण म्हणजे, आज ज्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यापैकी एक मुख्यमंत्री प्रमोद सावंत सोडल्यास इतर 8 मंत्र्यांचा मूळ राजकीय पक्ष काँग्रेसच आहे.

सावंत सरकारात आज मंत्री म्हणून शपथ घेतलेले विश्वजीत राणे, माविन गुदिन्हो, रवी नाईक, सुभाष शिरोडकर आणि बाबूश मोन्सरात हे यापूर्वी काँग्रेस सरकारात मंत्री होते. गोविंद गावडे यांनी मागची निवडणूक अपक्ष म्हणून लढले असले तरी त्यापूर्वी त्यांनी काँग्रेस उमेदवारीवर निवडणूक लढविली आहे. नीलेश काब्राल आणि रोहन खंवटे यांनी जरी कधी काँग्रेस पक्षाच्या निशाणीवर निवडणूक लढविली नसली त्यांची राजकीय सुरवात काँग्रेस पक्षातूनच झाली आहे. याबद्दल राजकीय विश्लेषक क्लिओफात कुतिन्हो म्हणाले, हे मंत्रिमंडळ कुठल्याही कार्यक्षमतेच्या निकषावर गठित केलेले नसून राजकीय अपरिहार्यतेतून बनले आहे. सध्या भाजप हा पक्ष गोव्यात तरी ‘पार्टी विथ डिफरन्स’ राहिलेला नसून तोही आता सत्तेची गणिते पाहूनच राजकीय वाटचाल करू लागला आहे.

In Goa eight ministers belong to original Congress
नव्या मंत्रिमंडळात सासष्टीची उपेक्षा

काँग्रेससमोर पेच

भाजपही आता बदलू लागला असून हा पक्ष केवळ एका गटापुरता सीमित न राहता त्यात सर्वसमावेशकता येऊ लागली आहे, त्याचे हे द्योतक असे मानले जाते. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा या मंत्रिमंडळाला पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हे मंत्रिमंडळ घडविले आहे, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेससमोरील अडचणी आणखी वाढणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com