कठीण परिस्थितीत काँग्रेसने आमदारांची संख्या 1 वरून 11 केली; अमित पाटकर

2027 मध्ये राज्यात काँग्रेसचे सरकार आणणार; अमित पाटकर
In difficult circumstances, the Congress increased the number of MLAs from 1 to 11; Amit Patkar
In difficult circumstances, the Congress increased the number of MLAs from 1 to 11; Amit PatkarDainik Gomantak

देशात पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकींचा निकाल लागला असून भाजपने चार राज्यात तर आप ने पंजाबमध्ये सत्ता काबीज केली आहे. मात्र देशातील सर्वात जुन्या पक्षाला सत्ता खेचून आणता आलेली नाही. यावरून काँग्रेस या पाचही राज्यात संघटनात्मक बदल करण्याचे ठरवले होते. त्याप्रकारे इतर राज्यात तसे बदल केले जात आहेत. तसाच बदल गोव्यात ही झाला असून गोवा काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. काँग्रेसने गोवा प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीच्या अध्यक्षपदी अमित पाटकर आणि कार्लोस फरेरा यांची यांची 'मुख्य व्हिप' म्हणून नियुक्ती झाली आहे.

In difficult circumstances, the Congress increased the number of MLAs from 1 to 11; Amit Patkar
कथित खंडणी प्रकरणी धर्मेश सगलानी पोलिसांच्‍या ताब्‍यात

दरम्यान, कठीण परिस्थितीतही काँग्रेसने आमदारांची संख्या 1 वरून 11 केली. पक्षाला यापुढे आणखी चांगले दिवस आणण्यासाठी शंभर टक्के योगदान देणार आणि 2027 मध्ये राज्यात काँग्रेसचे सरकार आणणार असल्याचा ठाम विश्वास नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केला आहे.

गोव्यात भाजपने (BJP) सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. प्रमोद सावंत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसला 2027 पर्यंत आता विरोधी पक्ष म्हणूनच काम करावे लागणार आहे. दरम्यान गोवा काँग्रेसमध्ये करण्यात आलेले हे बदल गोव्याच्या राजकारणात (Politics) आणि गोवा (Goa) काँग्रेसमध्ये कोणते परिणाम करतात हे पाहावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com