NSUI Goa
NSUI GoaDainik Gomantak

RSSची विचारसरणी शिक्षण व्यवस्थेत आणण्याची मोदी सरकारची तयारी : एनएसयूआय

भाजप भारताची लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष व्यवस्था संपवत आहे

NSUI Goa : नरेंद्र मोदी सरकार शिक्षण व्यवस्थेत ढवळाढवळ करत आहे. तसेच लोकशाही आणि राष्ट्रीय संघर्षाचे अध्याय हटवून आरएसएसची विचारधारा जोडत असल्याचा आरोप एनएसयूआय गोवा विभागाने केला आहे. एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

एनसीईआरटीमधून लोकशाही आणि विविधतेचे अध्याय वगळण्यात आले आहेत. लोकप्रिय संघर्ष चळवळी आणि लोकशाही अध्यायांपुढील आव्हानेही वगळण्यात आली आहेत. जेव्हा हे महत्त्वाचे अध्याय वगळले जातात तेव्हा आपल्या देशाची मुले काय शिकणार आहेत,” असा प्रश्नही त्यांनी केला.

NSUI Goa
Vikas Tirth Yatra : भाजपच्या दक्षिण गोव्यातील ‘विकास तीर्थ यात्रे’ ला सुरुवात

नौशाद चौधरी म्हणाले की, "इयत्ता नववीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील महत्वाचे अध्याय एनसीईआरटीने काढले आहेत. संसदेत विरोधकांचे माईक बंद करून विरोधकांचा आवाज कसा दाबला जातो तसेच भाजप आणि मोदी सरकारचा लोकशाहीवर विश्वास नाही हे त्यांनी दाखविले आहे."

"आता पहिल्यांदा मतदान करायला जाणाऱ्या मतदारालाही इतिहासाची माहिती न मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत,” असे चौधरी म्हणाले.

NSUI Goa
Monsoon 2023: मॉन्सून 48 तासांत गोव्यात धडकणार; सोबत बिपरजॉय’चंही संकट, 11 जूनपर्यंत या गोष्टीचा धोका

"भाजप सरकारने केलेली शिक्षणाची सध्याची व्यवस्था विद्यार्थ्यांना लोकशाहीचे पैलू जाणून घेण्यापासून वंचित करेल. ते महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा इतिहास पुसून टाकत आहेत आणि देशासाठी काहीही न करणाऱ्या विनायक दामोदर सावरकरांचे अध्याय जोडत असल्याचा आरोप यावेळी केला.

स्वातंत्र्यलढ्यात आरएसएस आणि भाजपचे काहीच योगदान नव्हते. भाजप हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाच्या नावावर जातीय राजकारण खेळत आहे. मोदी सरकार अल्पसंख्याकांना महत्त्व देत नसल्यामुळे मौलाना आझाद यांच्या नावाची शिष्यवृत्ती बंद केली आहे असे चौधरी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com