Vasco News : ‘एमपीए’चा नवा विक्रम; 17 तासांत 29 हजार टन लोखंडी पॅलेन्ट्स भरले जहाजात

Vasco News : स्टीव्हडोर डेल्टा इन्फ्रालोजिस्टिक आस्थापनाची कामगिरी
Ship
ShipDainik Gomantak
Published on
Updated on

Vasco News : वास्को, मुरगाव पत्तन प्राधिकरणच्या (एमपीए) धक्का क्र. १० वरून १७ तासात २९ हजार १५० मेट्रिक टन लोखंडी पॅलेन्ट्स एमव्ही एक्सप्लोर आफ्रीका जाहाजात लोड करून, एमपीएने नवीन विक्रम नोंदविला आहे.

सदर २९ हजार १५० मेट्रिक टन लोखंडी पॅलेन्ट्स १७ तासात जहाजात भरण्याचा विक्रम धक्का क्र.१० चे प्रमुख स्टीव्हडोर डेल्टा इन्फ्रालोजिस्टिक आस्थापनातर्फे करण्यात आल्याची माहिती एमपीएचे उपाध्यक्ष गुरुप्रसाद राय यांनी दिली आहे.

मुरगाव पत्तन प्राधिकरणाच्या (एमपीए) मध्ये यापूर्वी २८ हजार मेट्रिक टन माल जहाजात भरण्याचा विक्रम केला होता.त्याला मुरगाव बंदरातील स्टीव्हडोर डेल्टा इन्फ्रालोजिस्टिक आस्थापनाने पुन्हा एकदा मागे टाकले आहे.

मुरगाव बंदरातील धक्का क्र. १० वर एमव्ही - एक्सप्लोर आफ्रीका जहाजात लोखंडी पॅलेन्ट्स लोड करण्याचे काम डेल्टा इन्फ्रालॉजिस्टीक तर्फे हातात घेण्यात आले होते.

Ship
Goa Update 27 December: मिरामार येथे सापडलेल्या नवजात अर्भकाची माता ताब्यात; जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या बातम्या

यावेळी स्टीव्हडोर डेल्टा इन्फ्रालॉजिस्टिकने अप्रतिम काम सुरू करून, चक्क लोखंडी पॅलेन्ट्स जहाजात १७ तासात लोड करून नवीन विक्रम प्रस्तावित केल्याची माहिती एमपीएचे उपाध्यक्ष राय यांनी दिली. धक्का क्र. १० वरून लोखंडी पॅलेन्ट्स एमव्ही एक्सप्लोर लोड करताना सीएचएलडी आस्थापनाचा महत्वाचा वाटा असल्याचे राय यांनी सांगितले.

पर्यावरणस्नेही

लोखंडी पॅलेन्ट्स येथील पर्यावरणाला अनुकूल असून भविष्यात एमपीए त्यात आणखीन भर देणार आहे.

सदर एमव्ही एक्सप्लोर आफ्रीका जहाज लोखंडी पॅलेन्ट्स घेऊन केनिया बंदरात जाणार असल्याचे स्टीव्हडोर डेल्टा इन्फ्रालॉजिस्टिक आस्थापनातर्फे सांगण्यात आले आहे, असे एमपीएचे उपाध्यक्ष गुरुप्रसाद राय यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Harit Goa sapling Plantation
action against vagrants in Vasco
CM Pramod sawant sanad distribution margao
Goa Healthcare Expenditure
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com