Banastarim New Market
Banastarim New MarketDainik Gomantak

Banastarim Market: बाणस्तारी बाजारात गाळे मिळालेले ‘अधांतरी’

Banastarim Market: सरपंच ‘बॅकफूटवर: आदिवासी खात्याच्या सूचनांकडे लक्ष
Published on

Banastarim Market: बाणस्तारी येथील प्रसिद्ध गुरुवारचा आठवडी बाजार अखेर नवीन मार्केट इमारतीत भरला. मात्र, त्यावेळी रिव्होल्युशनरी गोवन्सच्या कार्यकर्त्यांनी भोम-अडकोणचे सरपंच दामोदर नाईक यांच्याशी गाळेवाटपावरून वाद घातला होता.

Banastarim New Market
Goa News: ..मग बांबोळीतील रस्ता कुणासाठी बदलला?

त्यावेळी मंत्री गोविंद गावडे यांनी हस्तक्षेप केल्याने सरपंच नाईक यांची सुटका झाली खरी, पण शुक्रवारी झालेल्या पंचायत बैठकीत सरपंच गाळा वाटपाच्या विषयावरून एकाकी पडले. त्यामुळे गाळे मिळविणाऱ्यांची स्थिती आता अधांतरी आहे.

आदिवासींसाठी असलेल्या तरतूद क्र. ३७५ (१) अन्वये केंद्र सरकारकडून राज्य सरकारने ४० कोटींची आर्थिक मदत मिळविली, त्यातून एखादे संकुल उभारताना त्याचा लाभ ३१ गावे व १३ पालिका प्रभागांना होणे आवश्‍यक असल्याचे म्हटले आहे. आदिवासी समाजातील लोकांनी भोम अडकोण पंचायतीकडे संकुलातील ४० टक्के गाळे वरील गावातील आदिवासींसाठी राखून ठेवण्याची लेखी मागणी केली होती.

सरपंचांची आश्चर्यजनक घाई : शुक्रवारी होऊ घातलेली पंचायत मंडळ बैठक व सोमवारी (ता. २ ऑक्टोबर) होणारी ग्रामसभा पाहता गुरुवारीच गाळे वाटपाची सरपंचांनी घाई का केली, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारच्या अटीनुसार या प्रकल्पाचा लाभ आदिवासींना मिळतो की नाही, हे पाहण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेवर टाकली आहे. त्यानुसार पंचायतीकडे त्या इमारतीचा ताबा आलेला आहे.

संकुलाला डॉ. जल्मीचे नाव द्या : या परिसरातील आदिवासींचे नेते आणि माजी आमदार स्व. काशिनाथ जल्मी यांचे नाव या संकुलाल द्यावे, अशी सूचना या पंचायतील आदिवासी सदस्यांनी मंडळाच्या मागील बैठकीत केली होती. परंतु तशी मागणी आपल्याकडे पोहोचली नसल्याचे आदिवासी खात्याचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com