Lohia Maidan Margao: निवडणूक काळात वाढते लोहिया मैदानाचे महत्त्व

Lohia Maidan Margao: गोवा मुक्ती पूर्वी व नंतर हे मैदान कित्येक महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार आहे.
Lohia Maidan Margao
Lohia Maidan Margao
Published on
Updated on

Lohia Maidan Margao

मडगावच्या लोहिया मैदानाला ऐतिहासिक महत्त्व आहे. आज कॉंग्रेस पक्षाने याच मैदानावरून आपल्या दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. प्रचारसभांसाठी या मैदानाचे महत्त्व आणखी अधोरेखित होणार आहे.

गोवा मुक्ती पूर्वी व नंतर हे मैदान कित्येक महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार आहे. गोवा मुक्तीनंतर विधानसभा, लोकसभा व इतर निवडणुकांबरोबर जनमत कौल, कोकणी राज भाषा अशा अनेक आंदोलनांसंदर्भातील कार्यक्रमांचे याच मैदानावर आयोजन झाले आहे व अजूनही होत आहे.

इथे पूर्वी विस्तृत अशी जागा होती. १८ जून १९४६ रोजी डॉ. राम मनोहर लोहिया व डॉ. ज्युलियो मिनेझीस यांनी या जागेवरून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले, त्यामुळे या मैदानाला डॉ. लोहिया मैदान असे नाव पडले.

२०२२ साली विधानसभा निवडणुकीच्या वेळी या मैदानाची दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम चालू होते त्यामुळे सभा होऊ शकल्या नव्हत्या. भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांचे प्रचार मोहीम प्रमुख आमदार दिगंबर कामत म्हणाले, आमही कोपरा बैठकांवर भर दिलेला आहे.

प्रचारार्थ भाजपचे ज्येष्ठ नेते येणार आहेत, त्यावेळी डॉ. लोहिया मैदानावर सभा घेण्याचा विचार आहे. ‘आरजी’ किंवा एखाद्या अपक्ष उमेदवाराच्या सभासुद्धा या मैदानावर अपेक्षित आहेत.

Lohia Maidan Margao
Francisco Sardinha: विरियातो यांना शुभेच्छा! 'आता मी फक्‍त आराम करणार'- फ्रान्‍सिस सार्दिन

दर निवडणुकीत प्रत्येक पक्षाची होते सभा

1) प्रत्येक निवडणुकीत सर्व पक्ष आपली एक तरी सभा या मैदानावर घेतात. यंदा ७ मे रोजी गोव्यात लोकसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे या मैदानाचे महत्व वाढणार आहे.

2) कॉंग्रेसच्या सभा अनेकदा या मैदानावर आयोजित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपनेही यापूर्वी कित्येक सभा याच मैदानावर घेतल्या आहेत व याहीवेळी या पक्षाच्या एक दोन सभा अपेक्षित आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com