सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात विर्डी येथे महाराष्ट्र राज्य सरकारच्या पाटबंधारे खात्याकडून धरण बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे उत्तर गोव्यातील पाणी प्रकल्पांवर परिणाम होणार आहे.
महाराष्ट्र राज्याच्या धरण बांधण्याच्या कृतीवर राज्य सरकारने बघ्याची भूमिका घेतल्याने विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. दरम्यान यावर आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र सरकार विर्डी धरण प्रकल्प पुन्हा सुरू करत असल्याबद्दल या प्रकरणावर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, गोवा सरकारने महाराष्ट्र सरकारला विर्डी येथे चालू असलेली धरण बांधण्याची कामे तात्काळ थांबवण्यासाठी नोटीस बजावली आहे. आम्ही या प्रकल्पासाठी त्यांना मिळालेल्या विविध मंजुरींची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
म्हादईची उपनदी असलेल्या वाळवंटी नदीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात विर्डी येथे महाराष्ट्र राज्य सरकारच्या पाटबंधारे खात्याकडून धरण बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी दिली.
गोव्याची जीवनदायिनी म्हादई कर्नाटक-महाराष्ट्र आणि गोव्यातून वाहते. पाणी वळवण्यासाठी केंद्रीय जलआयोगाची परवानगी अनिवार्य आहे. असे असताना महाराष्ट्र सरकारने धरण बांधण्यास सुरुवात केली असून त्याला केंद्रीय जलआयोगाचे परवाने नाहीत. त्यामुळे हे काम थांबवावे, यासाठी गोेवा सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी राजेंद्र केरकर यांनी केली होती.
विर्डी धरणामुळे उत्तर गोव्यातील साखळी, पडोशे आणि बार्देश तालुक्यातील काही पाणी प्रकल्पांवर विपरित परिणाम होणार आहेत. या प्रकल्पांना कच्चे पाणी मिळणे अवघड होणार आहे. त्यामुळे राज्यातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.