जीर्ण इमारतींबाबत त्‍वरित निर्णय घ्यावा: कृष्णा साळकर यांची मागणी

मुरगाव मुख्याधिकाऱ्यांना सादर केले पत्र
Krishna Salkar
Krishna SalkarDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: वास्को मुरगाव पालिका क्षेत्रातील असुरक्षित व धोकादायक इमारतीसंबंधी योग्य निर्णय पालिकेने घ्यावा, यासंबंधीचे पत्र वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी बुधवारी मुख्याधिकाऱ्यांना दिले. तसेच या इमारतीच्या एकंदर स्थितीसंबंधी आपण विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(Immediate decision should be taken regarding dilapidated buildings demand from Krishna Salkar)

Krishna Salkar
अटल सेतूची डागडुजी झाल्यावरच देखभाल!

येथील काही खासगी व पालिकेच्या मालकीच्या काही इमारती जीर्ण झाल्याने असुरक्षित बनल्या आहेत. या इमारतींच्या कॉंक्रिटचे पापुद्रे कोसळून पडण्याच्या घटना अधूनमधून घडत आहेत. काही इमारती कधीही कोसळून पडण्याच्या स्थितीत आहेत. यासंबंधी दखल घेऊन साळकर यांनी चिंता व्यक्त केली.

संबंधित खासगी इमारतींच्या मालक व भाडेकरू यांच्यात समन्वय साधण्याची गरज आहे. जेणेकरून त्या इमारती पाडून नवीन इमारती बांधता येतील, असे त्यांनी सागितले. पालिकेच्या इमारतीसंबंधी पालिकेने योग्य निर्णय घेऊन त्या जमीनदोस्त करण्याची गरज आहे. काही इमारतीच्या बाबतीत पालिकेने पुढाकार घेऊन त्या जमीनदोस्त कराव्यात. त्यासाठी खर्च संबंधित मालकांकडून वसूल करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

नोटीस बजावूनही दुर्लक्ष

असुरक्षित इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आल्याने मुरगाव पालिकेने दखल घेऊन तशा इमारतींची पाहणी फेब्रुवारी 2010 सुरू केली होती. त्यावेळी 32इमारती असुरक्षित असल्याच्या कारणास्तव संबंधितांना नोटिसा बजावल्या होत्या. तत्कालिन मुख्याधिकारी दीपाली नाईक यांनी त्या इमारती खाली करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविल्याची माहिती दिली होती. तथापि त्यानंतरही संबंधितांकडून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com