Goa Weather Update: राज्यात यलो अलर्ट; मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता

या काळात मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्यामार्फत करण्यात आले.
महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून (IMD) 'यलो अलर्ट'
महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून (IMD) 'यलो अलर्ट' Dainik Gomantak
Published on
Updated on

ऑक्टोबर हीटमुळे राज्यातील पारा वाढत चालला आहे. अशातच हवामान खात्याने राज्यात यलो अलर्ट जारी केला आहे. 30, 31 ऑक्टोबर रोजी वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून (IMD) 'यलो अलर्ट'
Vijai Sardesai: राष्ट्रीय खेळांमधील घोटाळे याआधीही उघड केले आहेत : विजय सरदेसाई

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 30, 31 ऑक्टोबर रोजी दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात गोव्यात 40 ते 50 किमीप्रतिवेगाने वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या काळात मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्यामार्फत करण्यात आले.

दरम्यान राज्यात पहाटे थंडी जाणवत आहे. सध्या किमान तापमान 24 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. घाटालगतच्या भागात सत्तरी, धारबांदोडा, मोले आणि राज्यातील बहुतांश भागात तीव्र थंडी जाणवत आहे. तर शहरी भागात तसेच किनारी भागात देखील अल्प प्रमाणात थंडीची चाहुल आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com