IMD: येत्या तीन दिवसात राज्यात वादळी वाऱ्याची शक्यता

कमी दाबाच्या पट्ट्यामूळे हवामान वादळी राहण्याची शक्यता
Asani Cyclone
Asani CycloneDainik Gomantak
Published on
Updated on

गेले दोन ते तीन दिवस राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरु असून काही वेळ पावसाचे वातावरण तयार होते. तर काही वेळाने उन्हाचे झळा सुरु होतात. यामूळे राज्यातील नागरिक ऊन पावसाच्या खेळाने अधिक परिणाम होत नाही. मात्र पूढील तीन दिवस राज्यात वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

(IMD forecasts cyclonic condition in goa for next three days due to low pressure belt)

Asani Cyclone
Mopa Airport: गोव्याच्या भाग्यविधात्याचे नाव विमानतळाला द्या

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानूसार येत्या तीन दिवसात गोव्याच्या किनार्‍यावर सुमारे 40 ते 60 किमी प्रतितास वारे वाहणार असल्याने नागरिकांनी समुद्र किनारी अथवा मच्छिमारांनी सतर्क रहावे अशी ही विनंती करण्यात आली आहे.

Asani Cyclone
सत्तरीतील बाराही पंचायतीवर बिनविरोध सरपंच निवड ?

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदानूसार कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रावरील वायव्यकडे सरकेल असं म्हटले आहे. त्यामूळे नागरिकांनी सतर्क रहाण्याची विनंती केली आहे तेसच कमी दाबाचा पट्टा पुढील 6 तासांत कमकुवत होईल. व वायव्यकडे वळेल आणि हळूहळू कमकुवत होईल. असा ही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Goa Congress: भाजपने आम्हाला देशभक्ती शिकवण्याची गरज नाही

गोवा काँग्रेसने आज भारतीय जनता पक्ष राबवत असलेल्या 'हर घर तिरंगा' कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. या कार्यक्रमातून भाजपने केवळ स्वत:ची जाहिरात सुरु केली आहे. त्यामूळे स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपली आहूती दिली ते या कार्यक्रमात कोठेही दिसत नाहीत. केवळ भाजप नेते आपलंच उद्दात्तीकरण करतायेत असे गोवा काँग्रेस प्रवक्ते अमरनाथ पणजीकर म्हणाले. पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात स्वातंत्र्यसेनानींचा भाजपला सोयिस्करित्या विसर पडला आहे. कारण ज्यांनी देशाला स्वातंत्र्य दिले त्या क्रांतिकारकांचा उल्लेख भाजपकडून झालेलाच नाही. आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमात स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहूती देणाऱ्यांना जाणीवपूर्वक बाजूला करत भाजप केवळ आणि केवळ आपल्या प्रसिद्धीसाठी याचा वापर करत आहे. काँग्रेस इतक्या खालच्या पातळीचं राजकारण कधीच करत नाही. भाजपने मात्र हेच केलं आहे. असा आरोप यावेळी काँग्रेसने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com