सत्तरीतील बाराही पंचायतीवर बिनविरोध सरपंच निवड ?

सत्तरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा
Gram Panchayats in Sattari taluka
Gram Panchayats in Sattari taluka
Published on
Updated on

वाळपई: सत्तरी तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींवर मंत्री विश्‍‍वजीत राणे यांचे समर्थक अर्थात भाजपचा झेंडा फडकणार हे आता निश्‍चित झाले आहे. तालुक्यातील सर्व पंचायतींमध्ये भाजप समर्थक उमेदवार निवडून आलेले आहेत. यामुळे सर्वच पंचायतींवर सरपंचांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.

(Possibility of unopposed Sarpanch elections in all Gram Panchayats in Sattari taluka )

Gram Panchayats in Sattari taluka
Goa Corona Update: दिवसभरात 158 नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद, शून्य मृत्यू

तालुक्यातील नगरगाव, सावर्डे, केरी व पर्ये या चार पंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे तेथे सरपंचपदासाठी कोणाला संधी मिळते हे पाहावे लागेल. पंचायतीच्या निवडणुकीत एकूण 11 पंच सभासदांची बिनविरोध निवड झालेली आहे.

सावर्डे पंचातीत 3, 4 व 5 हे प्रभागही महिलांसाठी राखीव आहेत. तर केरीत 1, 6 व 9 व पर्येत 4, 6, 9 हे प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत. गेल्‍या वेळी गुळेली, पिसुर्ले, ठाणे, मोर्ले या पंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी राखीव होते.

Gram Panchayats in Sattari taluka
Goa Congress: भाजपने आम्हाला देशभक्ती शिकवण्याची गरज नाही

सरपंचपदासाठी अनेकांचे प्रयत्‍न सुरू

तालुक्यातील सर्व पंचायतींमध्ये भाजप समर्थक उमेदवार निवडून आल्‍यामुळे सरपंचांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा अनेकांनी सरपंचपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू केलेले आहेत. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. त्‍यांच्‍या मार्गदर्शनाखाली सरपंच निवडले जातील, हे निश्‍चित.

Mopa Airport: गोव्याच्या भाग्यविधात्याचे नाव विमानतळाला द्या

म्हापसा: गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांच्या प्रती आजही लोकांच्या हृदयात आदराचे स्थान आहे. त्यामुळे बांदोडकरांच्या कार्याचा गौरव हा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्याकरिता भाऊसाहेबांचे नाव मोपा येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्या.

ही मागणी भाऊसाहेब बांदोडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा, पेडणे नामकरण समितीचे संघटक सुभाष केरकर यांनी केली. येत्या 15 ऑगस्टला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यासंदर्भात घोषणा करावी. मुख्यमंत्री पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकास भेट देतील, त्यावेळी आम्ही त्यांच्यासमोर ही मागणी करणार आहोत. सरकारने ही मागणी फेटाळल्यास आमचे हे आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशारा केरकर यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com