वाडी-शिवोलीत झाडांची सर्रासपणे कत्तल

भागात तणावपूर्ण स्थिती; संतप्त ग्रामस्थांकडून आंदोलनाची तयारी
Tree Cutting in Wadi Siolim
Tree Cutting in Wadi SiolimDainik Gomantak
Published on
Updated on

शिवोली : वाडी-शिवोली येथील सर्वे क्र. 313/1 या ‘फेमा’ कायद्यान्वये सरकारी कब्जात असलेल्या जागेतील असंख्य माडांची व झाडांची अज्ञाताने बुलडोझरने सोमवारी दिवसा कत्तल केली. दिल्लीस्थित बिल्डरकडून सदर जमीन बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा करून स्थानिकांनी आंदोलनाची तयारी चालवली आहे, असे साईनाथ कऴंगुटकर तसेच इतरांनी सांगितले.

मार्ना-शिवोली पंचायत क्षेत्रातील सर्वे क्र. 313/1 जागेत पोर्तुगीज काळापासून व्यंकटेश रामनाथ नाईक, दत्ता रामनाथ नाईक, गोविंद रामनाथ नाईक, साईनाथ साळगावकर, गोमती काशीनाथ नाईक, साळगावकर यांच्यासहित त्याच जागेत इतर हक्क धारण करणारे अग्नी शंकर साळगावकर, महादेव विष्णु आर्लेकर, विठ्ठल विष्णू आर्लेकर तसेच सगुण सिताराम कळंगुटकर यांची कुटुंबे पूर्वापार राहतात. तथापि या जागेचा काही भाग एका विदेशीने खरेदी केल्याने ‘फेमा’ च्या कचाट्यात सापडलेला आहे.

Tree Cutting in Wadi Siolim
गोव्यात एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना घरपोच अन्नधान्य मिळणार ?

स्थानिक पंचायत, बार्देश मामलतदार तसेच उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी तात्काळ लक्ष घालून येथील वादग्रस्त जागेचे परप्रांतीयांच्या घशात जाण्यापासून रक्षण करण्याची मागणी याभागातील ग्रामस्थांनी केली आहे. कार्यवाही न झाल्यास कुटुंबीयांसमवेत रस्त्यावर उतरू,असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, हणजूण पोलिस कक्षाकडून याबाबतीत चौकशीसाठी बोलावणे येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com