गोव्यात एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना घरपोच अन्नधान्य मिळणार ?

रेशन ज्येष्ठ नागरिकांच्या दारात वितरीत केले जाऊ शकते : नीलेश काब्राल
Senior citizen
Senior citizenDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत (पीडीएस) एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या दारात अन्नधान्य पोहोचवण्याच्या प्रस्तावावर राज्य सरकार विचार करत आहे, अशी माहिती समोर आली आहे.

Senior citizen
मिरामार किनारी होणार ‘ग्लोबल स्ट्रीट फूड हब’

सार्वजनिक बांधकाम मंत्री (पीडब्ल्यूडी) नीलेश काब्राल म्हणाले की, राज्यात एकटे राहणाऱ्या आणि रास्त भाव दुकानात जाणे कठीण असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत.

"अशा लोकांसाठी, रेशन त्यांच्या दारात वितरीत केले जाऊ शकते," काब्राल म्हणाले. ते पुढे म्हणाले, दहापैकी एक रास्त भाव दुकान असू शकते जे वास्तविक लाभार्थींना त्यांचा हक्क नाकारून तांदूळ, गहू आणि इतर वस्तूंचा काळाबाजार करण्यासाठी अवैध मार्ग वापरत असावे. अशा दुकानांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Senior citizen
उत्पन्नाचे दाखले देण्यास दिरंगाई ; विद्यार्थी त्रस्त

पाणी बिलांबाबत मंत्री म्हणाले की, गोव्यात एकूण 3.2 लाख पाणी ग्राहक आहेत त्यापैकी 1.48 लाखांना मोफत पाणीपुरवठा होतो, तर 1.53 लाख ग्राहकांना योग्य बिले मिळतात. ते पुढे म्हणाले की, सर्वोच्च ब्रॅकेटमध्ये केवळ 28,000 ग्राहकांनाच बिले मिळत आहेत. पाण्याची बचत करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे, जर एखाद्या ग्राहकाने 16,000 लिटर पाणी वापरले तर त्याला वापरलेल्या सर्व पाण्याचे पैसे द्यावे लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com