Illegal Tax Collection : ‘त्या’ व्हिडिओनंतर मनपाने खरेदी केली पावती मशीन

बेकायदा सोपो प्रकरणी कारवाईची अपेक्षा
Illegal Tax Collection
Illegal Tax CollectionDainik Gomantak

Illegal Tax Collection: महानगरपालिकेच्या मार्केट इमारतीबाहेर आणि मासळी मार्केटच्या अवतीभोवती रस्त्याच्या बाजूला वस्तू विक्रीसाठी बसणाऱ्या विक्रेत्यांकडून विना पावती सोपो कर आकारल्याचा प्रकार नगरसेवक उदय मडकईकर यांनी उघडकीस आणला. या प्रकाराची दखल घेत महापालिकेने तत्काळ पावती मशीन खरेदी केली.

आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी न केल्यास घडलेल्या प्रकाराविरोधात पोलिस तक्रार करणार असल्याची माहिती मडकईकर यांनी दिली आहे. दोन वर्षे विना पावती गोळा होणाऱ्या करातून नक्की किती रक्कम महानगरपालिकेच्या तिजोरीत जात असेल, असा प्रश्‍न कायम आहे.

Illegal Tax Collection
Vasco News : श्‍वानांचे निर्बिजीकरण मोहीम राबवणार

50 रुपये कर

मासळी व भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या विक्रेत्यांकडून महापालिका कर्मचारी 20 ते 50 रुपये सोपोकर घेते. परंतु या कराची कोणतीच पावती दिली जात नाही.

सोपो कराचा हा भ्रष्टाचार उघडपणे किती वर्षांपासून सुरू असावा, हे त्या कर्मचाऱ्यांनाच माहीत, असे मडकईकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com