Illegal Sand Mining: कुडचडे येथे बेकायदा रेतीउपसा, 2 ठिकाणी छापा; 132 क्युबिक मीटर रेती, सक्शन पंप जप्त

Zuwari River Sand Extraction: गाववाडा-शेळवण कुडचडे येथे जुवारी नदीतून सक्शन पंप लावून रेती उपसा केला जात असल्याचे निदर्शनास आलं. दोन ठिकाणी साठवून ठेवलेली सुमारे १३२ क्युबिक मीटर रेती आणि सक्शन पंप जप्त केला आहे.
Illegal Sand Mining
Illegal Sand MiningDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: राज्यात रेती उत्खनन करण्यास सक्त मनाई असतानाही गाववाडा-शेळवण कुडचडे येथे जुवारी नदीतून सक्शन पंप लावून रेती उपसा केला जात असल्याचे निदर्शनास आल्याने केपे मामलेदार, खाण खाते तसेच बंदर खात्याने छापे टाकून सुमारे दोन ठिकाणी साठवून ठेवलेली सुमारे १३२ क्युबिक मीटर रेती आणि सक्शन पंप जप्त केला आहे.

शेळवण-कुडचडे येथील सर्वे क्रमांक ६२/०, ६२/१, व ६२/२ भागात ज्या ठिकाणी पूर्वी डायगो नामक व्यक्ती रेती काढत होती, त्याच ठिकाणी आता मडगावस्थित एका महिलेने बेधडकपणे हा व्यवसाय सुरू केल्याने लोक अचंबित झाले आहेत.

काल (ता. ३०) हा प्रकार उघडकीस येताच केपेचे मामलेदार नाथन आल्मेदा, धर्मेंद्र नाईक (मरिन खाते), भूगर्भशास्त्रज्ञ ग्लांसिया फर्नांडिस, उपनिरीक्षक प्रज्योत बखले, अंजली नाईक, सर्कल इन्स्पेक्टर तसेच इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तेथे मोठ्या प्रमाणात रेती काढून ठेवल्याचे दिसून आले. तसेच सक्शन पंपही त्याठिकाणी होता. हे सर्व साहित्य जप्त केले असून कुडचडे पोलिसांना याचा ताबा दिला आहे.

Illegal Sand Mining
Goa Politics: "हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्वांनाच एकसमान मानतो, समतोल विकास हाच आमचा ध्यास"; कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

पोलिस ठाण्याचा ताबा कुणाकडे?

सध्या कुडचडे पोलिस स्थानकाचा ताबा कुणाकडे आहे, हेच माहीत नसल्याने बेकायदेशीर रेती व्यवसाय करणाऱ्यांचे बरेच फावले असून याचाच फायदा घेत दोन दिवसांपूर्वी एका महिलेने आपल्या हिस्ट्रीशिटर साथीदारांना घेऊन हा व्यवसाय सुरू केला होता. एका रात्रीत बरीच रेती काढली होती. त्यातील सुमारे वीस ट्रक रेती नेली असून सध्या सुमारे १३२ क्युबिक मीटर रेती जागेवर पडून होती. ती आज जप्त करण्यात आली.

Illegal Sand Mining
Goa Federation Onion Scam: 35 रुपये किलोने कांदा घेऊन चढ्या दराने विकला, गोवा फेडरेशनचे 'एमडीं'चे निलंबन

जमीनमालकाच्या विरोधात गुन्हा

उपसा केलेली रेती आणि सक्शन पंप ताब्यात घेतल्याने येत्या पाच दिवसांत यावर कुणीही आपला ताबा सिद्ध करू न शकल्यास याची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याचे बंदर कॅप्टन खात्याने सांगितले आहे. बेकायदा रेतीप्रकरणी जमीनमालकाविरोधात गुन्हा नोंद करण्याचे निर्देश कुडचडे पोलिसांना दिले असल्याचे केपेचे मामलेदार नाथन आल्मेदा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com