Illegal Sand Mining: बंदी असूनही पेडण्यात बेकायदा रेतीउपसा

न्यायालयाला माहिती : 950 घनमीटर रेतीसह ट्रक, होड्या जप्त
 Illegal Sand Mining
Illegal Sand Mining Dainik Gomantak
Published on
Updated on

Illegal Sand Mining: राज्यात रेतीउपशाला बंदी आहे. उच्च न्यायालयानेही वेळोवेळी बेकायदा रेती उपशासंदर्भात कारवाईचे निर्देश दिले आहेत. यावर देखरेख ठेवण्यासाठी व कारवाई करण्यासाठी सरकारी यंत्रणाही कार्यान्वित आहे.

तरी पेडण्यातील तेरेखोल व कामुर्ली नदीमध्ये रेतीउपसा सुरू आहे, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला याचिकादारातर्फे ॲड. नॉर्मा आल्वारिस यांनी दिली.

गेल्या तीन महिन्यांत दक्षिण गोव्यात सुमारे 950 घटमीटर बेकायदा उपसा केलेली रेती तसेच 6 होड्या व 3 ट्रक जप्त करण्यात आल्याची माहिती सरकारने दिली. उत्तर गोव्यातील अहवाल सादर करण्यासाठी ही सुनावणी येत्या 16 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली.

बेकायदा रेती उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोवा खंडपीठाच्या निर्देशानुसार सरकारने उत्तर व दक्षिण गोव्यात दोन वेगवेगळे नोडल अधिकारी नियुक्त केले होते. त्यानुसार दक्षिण गोवा नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नीलेश धायगोडकर यांनी खंडपीठात केलेल्या कारवाईचा अहवाल सादर केला.

1 ऑक्टोबर 22 ते 31 डिसेंबर 22 या तीन महिन्यांत आमोणा व खांडोळा नदी भाग, खोर्जुवे-कुडतरी, असोल्डा येथील कुशावती नदी, रेल्वे पुलाजवळील चांदोर परिसर, खांडेपार तसेच कंकण, सावईवेरे व वळवई येथे संबंधिक मामलेदारांनी लोकांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेऊन कारवाई केली आहे तसेच काही ठिकाणी छापेही टाकले आहेत.

 Illegal Sand Mining
Workers Union: मागण्या मान्य करा, अन्‍यथा आंदोलन; कामगार युनियनचा सरकारला इशारा

अशी झाली कारवाई

फोंडा मामलेदारने घाणो-वळवई येथून 10 घनमीटर रेती जप्त केली तर भरारी पथकाने दिगास-पंचवाडी येथून सुमारे 350 घनमीटर रेतीचे ढीग जप्त केले. मायणा-कुडतरी पोलिसांनी बेकायदा रेतीवाहू ट्रक ताब्यात घेऊन 5 घनमीटर रेती जप्त केली. याव्यतिरिक्त फोंडा मामलेदारांच्या भरारी पथकाने तारीर-पंचवाडी येथून 16 घनमीटर व गावठण खांडेपार येथे 15 घनमीटर रेती ताब्‍यात घेतली आहे.

फोंडा पोलिसांनी रेतीसह ट्रकाविरुद्ध कारवाई केली आहे. भरारी पथकाने दाबोळी-शिरोडा येथून 70 घनमीटर तसेच आंबेली येथून 32 घटनमीटर जप्त केली आहे.

सांगे मामलेदार भरारी पथकाने उगे येथून 11 घनमीटर, कापसे येथून 10 घटमीटर तर नायकिणी-वाळशे येथून 15 घटमीटर, फोंडा मामलेदार भरारी पथकाने फोंडचे भाट-सावई, बेतकी व कुडवाडा-खांडोळा येथून 80 घनमीटर रेती व 3 होड्या जप्त केल्या.

 Illegal Sand Mining
Winter In Goa: गोव्यात कडाक्याच्या थंडीने हुडहुडी

नेतुर्ली येथून 140 घनमीटर रेती जप्त करण्यात आली आहे. गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने पाठविलेल्या अहवालानुसार वाघुर्मे येथे छापा टाकला त्यावेळी दोन होड्या किनारी उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या.

मात्र, त्यात रेती नव्हती. फोंडचे भाट-सावई येथे एक होडी व 30 घनमीटर रेती जप्त करण्यात आली. घाणो-सावई येथे तीन होड्या किनारी उभ्या करून ठेवल्या होत्या व तिथे तात्पुरत्या झोपड्या मोडक्या अवस्थेत होत्या. त्या मोडण्याचे आदेश फोंडा मामलेदारांनी दिले.

वळवई येथे 9 होड्या जमिनीवर उभ्या करून ठेवलेल्या होत्या. मात्र, तेथे रेती सापडली नाही. बेतकी-खांडोळा येथे 3 होड्या उभ्या होत्या व 20 घनमीटर रेती होती ती जप्त करण्यात आली.

कुडवाडा-खांडोळा येथे दोन होड्या होत्या व त्या ठिकाणी 10 घनमीटर रेती होती. तेथे काही खोल्याही किनारी होत्या त्या मोडण्याचे आदेश फोंडा मामलेदारांनी दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com