ED Raid
ED RaidDainik Gomantak

ED Raid: पणजी, मुंबईसह काही शहरांमध्‍ये ईडीची छापेमारी! के. सी. वीरेंद्र केंद्रस्‍थानी, 110 कोटींचा मुद्देमाल जप्‍त

Goa Panaji Ed Raid: अवैध ऑनलाइन बेटिंग आणि त्यातून होणारे मनी लॉन्डरिंग उघडकीस आणत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पणजीसह अनेक शहरांत छापे टाकले. जप्तीची एकूण किंमत सुमारे ११० कोटी आहे.
Published on

पणजी: अवैध ऑनलाइन बेटिंग आणि त्यातून होणारे मनी लॉन्डरिंग उघडकीस आणत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पणजीसह अनेक शहरांत छापे टाकले. या छाप्‍यांमागे मुख्य सूत्रधार के. सी. वीरेंद्र व त्याचे सहकारी असून विविध गेमिंग वेबसाइट्सच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये वळविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

ईडीच्या बेंगळुरू विभाग कार्यालयाने २ सप्टेंबर २०२५ रोजी बेंगळुरू व चल्लकेरे येथे धाडी टाकल्या. ईडीने दिलेल्या माहितीनुसार तपास अद्याप सुरू असून, पुढील काही दिवसांत अधिक तपशील जाहीर होणार आहेत. दरम्यान, के. सी. वीरेंद्रची ईडी कोठडी ७ दिवस वाढविण्यात आली आहे.

पीएमएलए २००२ अंतर्गत झालेल्या या कारवाईत तब्बल ५५ कोटींच्या किमतीच्या उच्च श्रेणीतील गाड्या (त्यात मर्सिडीज बेंझ कारचा समावेश), ४०.६९ कोटी रुपयांची रोकड, तसेच बँक व डिमॅट खात्यांतील मिळून १४.४६ कोटी रुपयांची रक्कम गोठविण्यात आली आहे. या पहिल्या टप्प्यातील जप्तीची एकूण किंमत सुमारे ११० कोटी रुपये आहे.

ED Raid
ED Raid: गोव्यात 'ईडी'ची मोठी कारवाई! 2.86 कोटींची मालमत्ता जप्त; आलिशान व्हिला, अनेक भूखंडांचा समावेश

सोन्याचे दागिने, १० किलो चांदी जप्त

पणजी, गंगटोक, जोधपूर, हुबळी आणि मुंबई येथे झालेल्या धाडीत १२ कोटींची रोकड, ६ कोटींचे सोन्याचे दागिने आणि १० किलो चांदी जप्त करण्यात आली आहे.

ED Raid
FDA Raid: ‘एफडीए’ ॲक्शन मोडवर! 2460 किलो चिकन, 500 किलो पनीर, 10 किलो खवा जप्त

या अतिरिक्त कारवाईची एकूण किंमत १८ कोटींपेक्षा अधिक असल्याची माहिती ईडीने दिली आहे. तपासात काही निधी दुबईतील शेल कंपन्यांमार्फत वळविला गेल्याची माहिती ईडीने दिली आहे.

यामध्ये कॅस्टल रॉक प्रोजेक्ट मॅनेजमेंट सर्व्हिस आणि लस्कस कोर प्रोजेक्ट मॅनेजमेंट सर्व्हिस या कंपन्यांचा समावेश असून, त्या के. सी. वीरेंद्रने के. सी. तिप्पेस्वामी, पृथ्वी एन. राज, अनिल गौडा व इतरांच्या भागीदारीत स्थापन केल्याचे उघड झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com