मुख्यमंत्र्यांचा आदेश तरीही बेकायदेशीर मालिश सेवा सुरूच; रिव्होल्युशनरी गोवन्सकडून कळंगुट किनाऱ्यावरील Video Viral

Goa Illegal Massage Services: किनाऱ्यांवरील बेकायदेशीर मालिश सेवांवर बंदी तरीही पर्यटकांना मालिश सेवा देण्याचा व्यवसाय सुरूच असल्याचा प्रकार
 Goa illegal massage services
Goa illegal massage servicesDainik Gomantak
Published on
Updated on

अलीकडेच गोवा सरकारने किनाऱ्यांवरील बेकायदेशीर मालिश सेवांवर बंदी घातली जाणार असल्याची माहिती स्पष्ट केली आहे, मात्र तरीही सरकारच्या या निर्णयाला न जुमानता पर्यटकांना मालिश सेवा देण्याचा व्यवसाय सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीने इंस्टाग्रामवर शेअर केलेला असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालतोय.

रिव्होल्युशनरी गोवन्सकडून व्हायरल करण्यात आलेला हा व्हिडीओ १२ एप्रिल रोजी सायंकाळी ७:५६ वाजता कळंगुट किनाऱ्यावर शूट करण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वीच किनाऱ्यांवरील अशा बेकायदेशीर मालिश सेवांवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. मात्र, या बंदीला न जुमानता एक परप्रांतीय महिला पर्यटकांना मालिश सेवा पुरवत असल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

काही महिन्यांपूर्वी कांदोळीच्या समुद्र किनाऱ्यावर बेकायदेशीरपणे मालिश सेवा देणाऱ्या तीन महिलांना गोवा पोलिसांनी अटक केली होती. या महिलांनी सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता पर्यटकांना मालिश सेवा पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलांना पंचांसमोर उपजिल्हा पर्यटन संचालकांच्या न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर पर्यटन संचालकांनी प्रत्येक महिलेला २५,००० रुपये दंड ठोठावला मात्र त्यांनी दंड भरण्यास नकार दिल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

समोर आलेल्या माहितीनुसार कांदोळी किनाऱ्यावरील मालिश सेवेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतरच पोलिसांनी तातडीने कारवाई केली होती तसेच स्थानिकांच्या तक्रारीनंतर गोवा सरकारकडून किनाऱ्यांवर बेकायदेशीर मालिश सेवा देणाऱ्या दलालांना आणि व्यक्तींना यापूर्वीच चेतावणी दिली गेली होती. आता पुन्हा एकदा रिव्होल्युशनरी गोवन्सकडून जारी केलेल्या व्हिडीओमुळे किनाऱ्यांवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार काय कारवाई करतं हे पाहणं रंजक ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com