Illegal Gambling: गोव्याच्या कॅसिनोत मोठी कारवाई! 11 जणांना अटक; 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

Illegal gambling in Goa casino: कांदोळी येथे असलेल्या 'पपीज कॅसिनो गोल्ड'मध्ये बेकायदेशीर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने छापा टाकून ११ जणांना अटक केली
Goa casino arrested gamblers
Goa casino arrested gamblersDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: गोव्यातील कांदोळी येथे असलेल्या 'पपीज कॅसिनो गोल्ड'मध्ये बेकायदेशीर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने छापा टाकून ११ जणांना अटक केली आहे. बुधवार (दि.६) रोजी पहाटे केलेल्या या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्या आणि खेळवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे १२:१५ ते ३:०० च्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. पीआय तुषार लोटलीकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कॅसिनोमध्ये सुरू असलेल्या 'अंदर बहार' नावाच्या पत्त्यांच्या जुगारावर छापा टाकला. यावेळी जुगार खेळणाऱ्या ११ जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (GDDPG Act) गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

Goa casino arrested gamblers
Goa Crime: '32 तासांत एकाचा जीव जातोय, गुन्ह्यांची आकडेवारी भयानक पण शिक्षेचे प्रमाण कमी'; विधानसभेत सरदेसाईंचा हल्लाबोल

अटक करण्यात आलेल्यांमध्ये गोव्यातील दोन कर्मचाऱ्यांसह मुंबई, दिल्ली, बिहार आणि कर्नाटकातील विविध शहरांतील नागरिकांचा समावेश आहे. या कारवाईमुळे या बेकायदेशीर जुगारात विविध राज्यांतील लोकांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे टेबल, रिझल्ट दाखवणारे डिस्प्ले स्क्रीन, पत्त्यांचे कॅट, चिप्स आणि जुगाराचे इतर साहित्य जप्त केले.

जप्त करण्यात आलेल्या या सर्व सामानाची अंदाजे किंमत ३५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा करत असून, यामागे आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जातोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com