Candolim Casino Raid: कांदोळीत कॅसिनोवर पोलिसांचा छापा, 'अंदर-बाहर' जुगार खेळताना 11 जणांना रंगेहाथ पकडलं

Casino Raid: कांदोळीतील पप्पीज कॅसिनो गोल्डमध्ये बेकायदा ‘अंदर-बाहर’ जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हा शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून ११ संशयितांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
Candolim Casino Raid
Candolim Casino RaidDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : कांदोळीतील पप्पीज कॅसिनो गोल्डमध्ये बेकायदा ‘अंदर-बाहर’ जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हा शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून ११ संशयितांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

याप्रकरणी गोवा दमन आणि दीव पब्लिक गॅम्बलिंग (जीडीडीपीजी), कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. सर्व संशयितांना अटक करून नंतर जामिनावर मुक्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.

Candolim Casino Raid
Goa Contractual Teachers: कंत्राटी शिक्षकांसाठी 'गूड न्यूज'; कायम करण्‍यासाठी सरकार आखणार योजना, अपात्र शिक्षकांना घरी पाठवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

ही कारवाई मंगळवारी रात्री १२.१५ ते ३ वाजेपर्यंत करण्यात आली. याबाबतची तक्रार पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी केली आहे.

Candolim Casino Raid
Goa: राज्‍यात तब्बल 1,14,840 पाळीव आणि मोकाट कुत्रे! 9,459 भटकी गुरे; पशुसंवर्धन खात्याची माहिती

कारवाईमध्ये संशयित नरेशकुमार चौधरी (वय ४७ वर्षे, रा. बिहार), कुणाल निहार (वय ३६ वर्षे, रा. मुंबई), अरविंदर सिंग (वय ५६ वर्षे, रा. दिल्ली), दिनेश दोडेजा (वय ३७ वर्षे, रा. ठाणे), रामचंद्र यल्लप्पा (वय ५४ वर्षे, रा. बंगळुरू), वेंकटेश राव (वय ५५ वर्षे, रा. कर्नाटक), किरणकुमार (वय ३६ वर्षे, रा. कर्नाटक), श्रीनिवास सी. एन. (रा. कर्नाटक), मदनकुमार (वय ४१ वर्षे, रा. कर्नाटक), साहील सावंत (वय २६ वर्षे, रा. मांद्रे), क्लिफोर्ड मेंडोका (वय ४८ वर्षे, रा. तिसवाडी) यांना अटक केली आहे. पोलिसांनी जुगारासाठी वापरलेले सुमारे ३५ लाखांचे साहित्य जप्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com