Sada Varunapuri Highway: सडा-वर्णापुरी येथे होते आहे अवैध मासळी विक्री!

Illegal Fish Selling: दुर्घटना घडण्यापूर्वीच मासळी विक्रेत्यांना हुसकावून लावावे अशी रहिवाशांतून मागणी
Illegal Fish Selling: दुर्घटना घडण्यापूर्वीच मासळी विक्रेत्यांना हुसकावून लावावे अशी रहिवाशांतून मागणी
Illegal Fish Selling Sada Varunapuri HighwayDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सडा ते वर्णापुरी या महामार्ग दरम्यान वर्णापुरी येथे महामार्गालगत अवैध मासळी विक्री सुरू असून एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच या मासळी विक्रेत्यांना तिथून हुसकावून लावावे, अशी स्थानिक रहिवाशांतून मागणी होत आहे.

काही काळापूर्वी सडा-वर्णापुरी हा मार्ग पूर्ण होऊन वाहनचालकांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे वाहन चालकांचा वेळ व पैसाही वाचत आहे. बहुतांश वाहनचालक या महामार्गचा वापर करणे पसंत करतात.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी वर्णापुरी येथे महामार्गालगतच मासे विक्री सुरू झाली आहे. या प्रकारामुळे या मार्गावरून येजा करणाऱ्या वाहनांना अडचणींचा सामना करावा लागतो. वाहतुकीस अडसर निर्माण होत असल्याने वादही उद्‍भवतात.

Illegal Fish Selling: दुर्घटना घडण्यापूर्वीच मासळी विक्रेत्यांना हुसकावून लावावे अशी रहिवाशांतून मागणी
Landslide in Sada: परतीच्या पावसाचा दणका! सडा येथील मशिदीजवळ भूस्खलन

मात्र, या गैरप्रकाराकडे प्रशासकीय यंत्रणेतील तसेच पालिकेतील कोणाचेही लक्ष नाही, याचेच स्थानिकांना आश्‍चर्य वाटते. या मार्गावरील वर्णापूरी येथे बहुतेक रविवारी व बुधवारी सकाळी मासेविक्री मोठ्या प्रमाणात सुरू होते ती दुपारी उशिरापर्यंत चालु असते.

हे मासे चांगल्या प्रतीचे असल्याने तसेच सध्या मासेमारी बंदी काळ चालू असल्याने या ठिकाणी मासळी खरेदीसाठी मत्स्यप्रेमींची बरीच गर्दी उसळलेली असते. विशेषतः या ठिकाणी मासे खरेदीसाठी येणारे हे बहुतेकजण दुचाकी घेऊन येतात. या दुचाकी रस्त्यावरच पार्क करून मासळी खरेदी केली जात असल्याने वाहतुकीस अडचण उद्‍भवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Murgaon Raja Shed Demolition
Bicholim Fish Market
Migrants and Crime in Goa
Headland Postal Department Property
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com