Landslide in Sada: सध्या परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. दशकातील तिसरा सर्वाधिक पाऊस यावर्षी झाला आहे. यामुळे ठिकठिकाणी पडझडीच्या घटनाही वाढल्या आहेत.
यातच रुमदावाडा, सडा येथील मशिदीजवळ भूस्खलन झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दरड कोसळल्याने तिथल्या घराचे शौचालय दुसऱ्या घरावर कोसळले.
ही घटना पहाटे 5.30 च्या सुमारास घडली. याबाबत मामलतदार म्हणाले की, बाधित घरातील रहिवाशांना सांकवाळ येथील निवारागृहात स्थलांतरित केले जाईल आणि धोकादायक घरे ओळखण्यासाठी सर्वेक्षण केले जाईल. तसेच मुरगाव परिषदेचे चेअरपर्सन गिरीश बोरकर म्हणाले की, संरक्षक भिंत बांधण्याचा प्रस्ताव लवकरच हाती घेतला जाईल.
माहितीनुसार, भूस्खलनामुळे अनिता अनंत परब यांच्या घराच्या छताच्या टाइल्सचे नुकसान झाले असून सैफुल्ला शेख यांच्या राहत्या घराचा टॉयलेट ब्लॉक कोसळला आहे. मुरगाव तालुक्याचे मामलतदार प्रविणजय पंडित, मंडल निरीक्षक मांद्रेकर, तलाठी जितेंद्र कामत आणि दामोदर नाईक यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
मामलतदारांनी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना या भागात भूस्खलन रोखण्यासाठी संरक्षक भिंत उभारण्याचे निर्देश दिले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.