Goa Fish Market: अवैधरित्या मासळी विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई

Vasco Fish Market: महिलांकडून अवैधरित्या होणारी मासे विक्री बंद करण्याची मागणी
Illegal Fish Sale
Illegal Fish SaleDainik Gomantak
Published on
Updated on

Illegal Fish Sale: वास्को येथील टी. बी. कुन्हा परिसरातील मार्केटच्या रस्त्यावर अतिक्रमण करून अवैधरीत्या मासे विक्री करणाऱ्या महिलांनी मुरगाव पालिकेच्या अधिकारी, निरीक्षकांसमोर आव्हान उभे केले आहे. अवैधरित्या मासे विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र, कारवाई तर दूरच राहिली याउलट तेथे मासे विक्री करणाऱ्या महिलांची संख्या दुप्पट झाली आहे. या मासे विक्री करणाऱ्या महिलांना राजकीय तसेच पालिका अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई होत नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

मुरगाव पालिकेतर्फे बैठे व सिमेंटचे छप्पर असलेले मासळी मार्केट (Fish Market) पाडून तेथे नवीन इमारत बांधण्यात येत आहे. त्यासाठी तेथील मासे विक्रेत्यांना देव दामोदर ट्रस्टच्या मोकळ्या जागेत तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या शेडमध्ये हलविण्यात आले आहे. आम्ही मार्केटातून जाण्यास तयार आहोत. परंतु घाऊक मासळी विक्री व रस्त्याकडेला काही महिलांकडून अवैधरित्या होणारी मासे विक्री बंद करण्याची मागणी केली होती. त्या मासळी विक्रेत्यांमुळे मार्केटमध्ये ग्राहक फिरकत नसल्याचा दावा संबंधित मार्केटातील विक्रेत्यांनी केला होता.

Illegal Fish Sale
Goa Government : गोव्यात सरकारी कर्मचाऱ्यांकडून ‘गृहआधार’चा गैरफायदा; 27 लाख वसूल

त्यानुसार घाऊक मासळी विक्रेत्यांविरोधात व रस्त्याकडेला मासे विक्री करणाऱ्या महिलांविरोधात कारवाई करण्यात आली होती. परंतु आता पुन्हा रस्त्याकडेला मासे विक्री करणाऱ्या महिला दिसू लागल्या आहेत. त्यांची संख्याही वीसपेक्षा अधिक झाली आहे. त्यांच्याविरोधात लवकरच कारवाई करण्याची आश्वासने देण्यात आली. परंतु अद्याप कारवाई झाली नाही.

व्यवसायावर परिणाम

रस्त्याकडेला अवैधरीत्या मासळी विक्री (Illigal Fish Sale) करणाऱ्या या महिला मार्केटात जेव्हा घाऊक पद्धतीने मासे विक्री करण्यात येते तेव्हा ती मासळी विकत घेतात. विकत घेतलेली मासळी ते मार्केटापासून अवघ्या शंभर मीटर्सवर असलेल्या रस्त्याकडेला बसून किरकोळ पद्धतीने विक्री करतात. त्यांच्याकडे चांगली व स्वस्त मासळी मिळत असल्याने ग्राहक तेथे मासळी विकत घेण्यास पसंती देतात. त्यामुळे मार्केटातील मासे विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होतो.

Illegal Fish Sale
Indian Super League: एफसी गोवासाठी करंडक जिंकण्याची भूक

वाहतुक कोंडी होते

रस्त्याकडेला बसणाऱ्या महिलांनी मासळी विकू नये असे आवाहन वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी केले होते. परंतु त्या आवाहनाला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. महिला मार्केटच्या रस्त्यावरच बसत असल्याने तेथे पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होतो. तसेच दुचाकी वाहनचालक मासे घेण्यासाठी थांबत असल्याने इतर वाहनांना अडथळा होतो. यासंबंधी संबंधितांनी योग्य तोडगा काढण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com