Indian Super League: एफसी गोवासाठी करंडक जिंकण्याची भूक

नोह सादौई: मोरोक्कन विंगर आगामी मोसमात यशस्वी कामगिरीसाठी प्रेरित
Indian Super League: एफसी गोवासाठी करंडक जिंकण्याची भूक
Published on
Updated on

पणजी: आगामी इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेत मैदानावर करंडक जिंकण्यासाठी आपल्यासह एफसी गोवाचे (FC Goa) सारे खेळाडू भुकेलेले आहेत, असे या संघाचा मोरोक्कन विंगर नोह सादौई याने गुरुवारी सांगितले. यशस्वी कामगिरीसाठी आपण प्रेरित असल्याची भावनाही त्याने व्यक्त केली.

गतवर्षी प्रारंभी आफ्रिकन नेशन्स स्पर्धेत मोरोक्कोने विजेतेपद मिळविले. त्या संघाचा सदस्य असलेल्या 28 वर्षीय नोह याचा हा भारतीय फुटबॉलमधील पहिलाच मोसम आहे. त्याने पत्रकार परिषदेत मते मांडली. एफसी गोवाचा यावेळच्या आयएसएल स्पर्धेतील पहिला सामना 12 ऑक्टोबर रोजी कोलकाता ईस्ट बंगालविरुद्ध (Kolkatta East Bengal) होईल.

Indian Super League: एफसी गोवासाठी करंडक जिंकण्याची भूक
सिली सोल्स प्रकरणी नवा खुलासा! हॉटेलचा FDI परवाना स्मृती इराणी यांच्या पतीच्या नावे

‘‘यशस्वी कामगिरीसाठी संघातील सारे खेळाडू भुकेलेले आहेत. सरावात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला समन्वय साधला गेला असून सारेजण प्रेरित आहे. प्रशिक्षक कार्लोस पेनया यापूर्वी संघाचे खेळाडू होते. त्यांचीही चांगल्या कामगिरीबाबत खेळाडूंसारखीच भावना आहे,’’ असे नोह म्हणाला.

यशस्वी ठरण्याचा विश्वास

‘‘मी संघात कोणत्याही जागी खेळू शकतो. विंगर अथवा स्ट्रायकर ही भूमिका मी यापूर्वीही चोख बजावलेली आहे. सध्या एफसी गोवा संघातील इतर खेळाडूंसमवेत मी सुरेख समन्वय साधला आहे, त्यामुळे मोसमात यशस्वी ठरण्याचा विश्वास वाटतो,’’ असे मोरोक्कोतर्फे चार आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या नोहने सांगितले.

एफसी गोवा पहिली पसंती

आपले पूर्ण लक्ष आता एफसी गोवाच्या कामगिरीवर केंद्रित असून त्यांच्यातर्फे शानदार कामगिरी करण्याचे आणि संघाला गुणतक्त्यात मजबूत स्थान मिळवून देण्याचे ध्येय असल्याचे नोह याने नमूद केले. यंदाच्या मोसमापूर्वी करारमुक्त असताना एफसी गोवा संघाला आपण पहिली पसंती दिली, अशी माहिती त्याने दिली. एफसी गोवाची खेळण्याची शैली आपल्याला आवडत असल्याचेही तो म्हणाला.

पुनरागमनाबाबत आशावादी

मोरोक्कोतर्फे नोह गतवर्षी सुरवातीस आंतरराष्ट्रीय सामने खेळला, त्यानंतर त्याला राष्ट्रीय संघातून वगळले गेले. मात्र आपण मोरोक्कोच्या राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याबाबत आशावादी असल्याचे तो म्हणाला. आयएसएल ही दर्जेदार स्पर्धा असल्याने आंतरराष्ट्रीय पुनरागमनासाठी या स्पर्धेतील कामगिरीची मदत होईल, असे त्याला वाटते.

Indian Super League: एफसी गोवासाठी करंडक जिंकण्याची भूक
Viral Video: फिजिक्सचा क्लास सुरु असताना अचानक लागला अश्लील व्हिडिओ

‘‘प्रत्येकाची बलस्थाने वेगळी आहेत आणि त्यांना एकत्र आणून जिंकण्यासाठी भक्कम मोट बांधण्यावर मेहनत घेत आहोत.’’

- नोह सादौई, एफसी गोवाचा खेळाडू

विविध देशांतील लीगचा अनुभव

नोह सादौईचे 2021 मध्ये झालेल्या ‘आफ्रिकन नेशन्स 2020’ स्पर्धेतील उपांत्य व अंतिम फेरीसह मोरोक्कोतर्फे 4 आंतरराष्ट्रीय सामने

युवा पातळीवर मोरोक्कोतील वायदाद कासाब्लांका क्लबमध्ये जडणघडण

वयाच्या 11व्या वर्षी अमेरिकेत स्थलांतरित, तेथील मेजर लीग संघ न्यूयॉर्क रेड बुल्स अकादमीत दाखल

नंतर इस्त्राईलमधील प्रीमियर लीग संघ मक्काबी हैफा, द्वितीय विभागीय संघ हापोएल क्फार साबा, हापोएल नाझारेथ इलिट या संघांचे प्रतिनिधित्व

दक्षिण आफ्रिकेतील अयॅक्स केप टाऊन (आताचा केप टाऊन स्पर्स) संघातर्फे 2015 मध्ये एमटीएन 08 स्पर्धा विजेता

2016 मध्ये अमेरिकेतील मायामी युनायटेडतर्फे नॅशनल प्रीमियर सॉकर लीग विजेतेपद

रियाल सीडी एस्पाना (होंडुरास), अल-काबुरा व मिरबात स्पोर्टस क्लब (दोन्ही ओमान), एनप्पी स्पोर्टस क्लब (इजिप्त), एमसी औदा, राजा कासाब्लांका, एएस एफएआर रबात (मोरोक्को) या संघांचेही प्रतिनिधित्व

Indian Super League: एफसी गोवासाठी करंडक जिंकण्याची भूक
Curlie's Night Club: वादग्रस्त कर्लिस नाईट क्लब होणार जमीनदोस्त

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com