..त्याला 'गोव्यात' यायचे होते, अमेरिकेत झाला स्थानबद्ध! पोर्तुगाल पासपोर्ट असून 'दिल्ली'त केले हद्दपार; काय झाले नेमके? वाचा

Illegal entry into America: बेकायदा अमेरिकेत प्रवेश केला म्हणून एकाला अमेरिकेत स्थानबद्ध करण्यात आले. त्याच्याकडे पोर्तुगीज नागरिकत्व व पासपोर्ट होता. तरीही अमेरिकेने त्याला दिल्लीत हद्दपार केले.
Illegal entry into America | 
Portuguese passport case
Illegal entry into America | Portuguese passport caseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बेकायदा अमेरिकेत प्रवेश केला म्हणून एकाला अमेरिकेत स्थानबद्ध करण्यात आले. त्याच्याकडे पोर्तुगीज नागरिकत्व व पासपोर्ट होता. तरीही अमेरिकेने त्याला दिल्लीत हद्दपार केले. अनिवासी गोमंतकीय आयुक्तालय कार्यालयातून ही मजेशीर माहिती प्राप्त झाली आहे.

आयुक्तालयाला तीन दिवसांपूर्वी दिल्लीच्या विमानतळावरून हेक्टर डिसिल्वा असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीचा फोन आला होता. त्याला अमेरिकेतून हद्दपार करून दिल्लीत पाठवण्यात आले होते आणि त्याला भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिल्लीत ताब्यात घेतले होते. त्याला तेथून सुटून गोव्यात येण्यासाठी मदत हवी होती.

पोर्तुगीज नागरिकाला कशी मदत करावी, असा प्रश्न उभा ठाकला असतानाच ती व्यक्ती गोव्यात आली. त्यानंतर तिने कोणतीही माहिती आयुक्तालयाला दिली नाही. ती व्यक्ती गोव्यातून पोर्तुगालला गेली होती. तेथे त्याने पोर्तुगीज पासपोर्ट व नागरिकत्व मिळवले. तेथून तो आर्यलंडला गेला. तेथून अमेरिकेत घुसला. त्यामुळे त्याला तो जेथून गेला तेथे किंवा पोर्तुगालला न पाठवता केवळ ‘ओसीआय’ कार्ड मिळाल्याने दिल्लीला पाठवण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्तालयाला नंतर मिळाली आहे.

Illegal entry into America | 
Portuguese passport case
Goa Tourist Safety: 'पर्यटकांशी गैरवर्तन खपवून घेणार नाही'! पर्यटन खात्‍याचा इशारा; जबाबदारीचे भान ठेवण्‍याचे आवाहन

अचानक येतो संदेश

आयुक्तालयातून मिळालेल्या माहितीनुसार, आजवर २० गोमंतकीयांना अमेरिकेने हद्दपार केले आहे. अजून किती जण अमेरिकेत स्थानबद्ध आहेत याची निश्चित माहिती नाही. एप्रिलपर्यंत हद्दपार करण्यात येणाऱ्यांची यादी आयुक्तालयाला मिळत होती मात्र आता तशी यादीही मिळत नाही. अचानक कधीतरी हद्दपार केलेली व्यक्ती दिल्लीत वा अन्यत्र पोचल्याचा संदेश मिळतो.

Illegal entry into America | 
Portuguese passport case
Goa Tourist: ..गोव्यात येताय? मग TIME वर माहिती द्या; पर्यटकांची नोंदणीसाठी सरकारतर्फे नवीन सॉफ्टवेअर

हद्दपारीला आव्हान

रिबेलो नावाचा एक तरूण सध्या अमेरिकेत स्थानबद्धतेत आहे. त्याने आपल्या हद्दपारीला तेथील उपलब्ध यंत्रणेच्या माध्यमातून आव्हान दिले होते. त्याचे आव्हान प्रशासकीय पातळीवर टिकले न गेल्याने त्याची हद्दपारी निश्चित झाली आहे. त्याच्याकडे पोर्तुगीज नागरिकत्व व पोर्तुगीज पासपोर्ट असल्याने त्याला पोर्तुगालला हद्दपार करण्यात येणार आहे. त्याला गोव्यात यायचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com