Goa Tourist Safety: 'पर्यटकांशी गैरवर्तन खपवून घेणार नाही'! पर्यटन खात्‍याचा इशारा; जबाबदारीचे भान ठेवण्‍याचे आवाहन

Goa Tourism: स्थानिक नागरिक किंवा पर्यटकांच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचवण्‍याचे प्रयत्‍न अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, अशा इशारा पर्यटन खात्‍याने दिला आहे.
Goa Coastal Board event permit
Goa Beach Event Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍यात आलेल्‍या पर्यटकांशी गैरवर्तन अजिबात खपवून घेतले जाणार नाही. गोव्यात राहण्याच्या काळात पर्यटकांनी आणि पर्यटनाशी संबंधित संस्थांनीही जबाबदार वर्तनाचे पालन करणे आवश्यक आहे. स्थानिक नागरिक किंवा पर्यटकांच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचवण्‍याचे प्रयत्‍न अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, अशा इशारा पर्यटन खात्‍याने दिला आहे.

गेल्‍या काही दिवसांत हरमल समुद्र किनाऱ्यावर काही भारतीय पर्यटकांकडून परदेशी महिलांना छेडछाड करण्यात आल्याची घटना घडली, तर वागातोर येथे एका आस्‍थापनातील बाऊन्सरकडून पर्यटकांसोबत अनुचित वर्तन केल्याचे समोर आले.

त्‍याचा वाराणसी येथील एका कुटुंबालाही त्रास झाला. पर्यटकांशी संबंधित कोणत्याही वादात हस्तक्षेप करण्याचा, पर्यटकांना कोणत्याही प्रकारची मारहाण, धमकी देण्‍याचा किंबहूना त्‍यांच्‍याशी गैरवर्तन करण्‍याचा अधिकार बाऊन्‍सर्सना नसतो. त्‍यामुळे आगामी काळात असे प्रकार समोर आल्‍यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असे पर्यटन खात्‍याने जारी केलेल्‍या पत्रकात म्‍हटले आहे.

Goa Coastal Board event permit
Goa Tourism: गोव्याचं पर्यटन संपलं नाही वाढलं! पर्यटन मंत्र्यांनी थेट आकडेवारीच दिली, सोशल मीडियावरील दावे काढले खोडून

यंदा पर्यटकांच्‍या संख्‍येत मोठी वाढ

यंदाच्‍या जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्‍यांच्‍या काळात राज्‍यात आलेल्‍या पर्यटकांच्‍या संख्‍येत ६.२३ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. गतवर्षी या काळात राज्‍यात ६९,२४,९३८ देशी पर्यटक आले होते. यंदा त्‍यात वाढ होऊन ही संख्‍या ७२,९६,०६८ इतकी झाली आहे.

ही वाढ ५.३६ टक्‍के इतकी आहे. तर, गतवर्षी या काळात २,५९,८२० इतके विदेशी पर्यटक आले होते. परंतु, यंदा त्‍यात तब्बल २९.३३ नी वाढ झाली असून, यंदा ३,३६,०३१ इतक्‍या विदेशी पर्यटकांची वाढ झाली आहे. पर्यटक वाढत असल्‍याने राज्‍याच्‍या पर्यटनाला गती आलेली आहे. त्‍यामुळे पर्यटक खाते पर्यटकांची सुरक्षितता आणि त्‍यांच्‍या सोयी–सुविधांवर परिणाम करणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवून आहे, असेही खात्‍याने म्‍हटले आहे.

Goa Coastal Board event permit
Goa Tourism: गोव्याचे किनारे 'दलालमुक्त' होणार! पर्यटनमंत्री खंवटेंचा निर्धार; हंगामाच्या प्रारंभी पर्यटक वाढल्याचा दावा

पर्यटनस्‍थळांवर दिवस-रात्र गस्त ठेवण्‍याचे, महत्त्वाच्या ठिकाणी लक्ष केंद्रीत करण्‍याचे तसेच पर्यटकांना बाधा पोहोचेल अशा घटना घडू न देण्‍याचे निर्देश पोलिसांना देण्‍यात आले आहेत. पर्यटकांनी कोणत्याही तक्रारी किंवा मदतीसाठी १३६४ या हेल्‍पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

केदार नाईक, संचालक, पर्यटन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com