Sand Extraction: रेती व्यवसायाविरुद्ध होत असलेल्या कारवाईवेळी अधिकाऱ्यांना फोन करून भाजप खासदाराने हस्तक्षेप केला, हे सर्वांना माहीत झाले आहे. भाजप सरकार उच्च न्यायालयाचे आदेशही पायदळी तुडवत आहेत, ते लोकशाही मानत नाहीत.
राज्यात जो बेकायदा रेती व्यवसाय सुरू होता तो भाजप सरकारमुळेच हे आता स्पष्ट होत असल्याची टीका आम आदमी पक्षाचे समन्वयक ॲड. अमित पालेकर यांनी केली.
भाजपच्या खासदारांच्या कारवाईतील हस्तक्षेपाची ॲडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. त्यावर ॲड. पालेकर यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, राज्यात बेकायदा रेती व्यवसाय हा भाजप सरकारमुळेच चालल्याचे स्पष्ट होते.
रेती काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बोटी या बाहेरील असल्या तरी अशाप्रकारे अनेक वर्षांपासून असा व्यवसाय सुरू होता, हे दिसून येते.
न्यायालयाच्या आदेशान्वये बोटी तोडण्याची प्रक्रिया संबंधित यंत्रणा करीत होती, परंतु सरकार त्यात हस्तक्षेप करीत असल्याचे आता सर्व जनतेसमोर आले आहे. आम्ही हे प्रकरण धसास लावणार आहोत,
भाजप सरकारमधील नेते न्यायालयापेक्षाही स्वतःला मोठे मानतात, ते न्यायालयाचे आदेश मानत नाहीत, असे त्यांनी नमूद केले. येणाऱ्या निवडणुकीत जनता या सरकारला निश्चितच धडा शिकवेल, असेही त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.