सांगे : सांगेतील नियोजित आयआयटी प्रकल्पाच्या विरोधाला सांगेतील अंतर्गत राजकारण कारणीभूत असून या विरोधकांना सावित्री कवळेकर यांची फूस असल्याचे उघड झाले आहे. पंचायत निवडणूक तोंडावर आलेली असताना सांगेतील पंचायती कोणाच्या ताब्यात असणार, या राजकारणाची या वादाला किनार आहे, असे सांगण्यात येत आहे.
सांगे येथे रविवारी या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी जी बैठक बोलविण्यात आली होती, त्या बैठकीला बहुतेक कवळेकर यांचेच समर्थक उपस्थित होते. कवळेकर यांचे खंदे समर्थक असलेले नगरसेवक मेशू डिकॉस्ता हे या गटाचे नेतृत्व करत होते. अन्य विरोधकही सावित्री कवळेकर यांचेच समर्थक असल्याने या विरोधाला सावित्री विरुद्ध सुभाष याच कोनातून पाहिले जात आहे.
भाजपच्या गोटात जी चर्चा चालू आहे. त्यानुसार या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी जे विरोधक जमले होते, त्या विरोधकांची सभेपूर्वी मळकर्णे येथे पार्टी झाली होती. या पार्टीला स्वतः माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हे स्वतः हजर होते, असे सांगितले जाते. त्यामुळे आयआयटी विरोधी आंदोलनाला स्वतः बाबू कवळेकर यांचा पाठिंबा असल्याचे सांगितले जाते.
या बैठकीला जे उपस्थित होते, त्यापैकी मेश्यू डिकॉस्ता यांच्यासह अन्य विरोधक यापूर्वी या प्रकल्पाला समर्थन आहे, की विरोध हे अजमावून पाहण्यासाठी जी बैठक बोलावली होती, त्या बैठकीत हजर होते. मात्र त्यावेळी कोणाचा विरोध असल्यास तो मांडा, असे सांगूनही यांपैकी एकानेही आवाज उठविला नव्हता. मग आताच का हा विरोध असा सवाल सध्या भाजप समर्थकांकडून केला जात असून याची दखल भाजप पक्षश्रेष्ठींनी घ्यावी, अशी मागणी होत आहे.
या विरोधामागे माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचा थेट संबंध असून हा विरोध चालू असताना त्यांची 7080 क्रमांकाची गाडी सांगे परिसरात फिरत होती. ही सरळसरळ पक्षविरोधी कृती असून त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असा सवाल भाजप कार्यकर्ते करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.