IIT Exam Cheating: ‘मुन्नाभाई’ स्टाईल जुगाड पडला महागात! फर्मागुढीच्या आयआयटी परीक्षेत ब्लूटूथचा वापर करुन कॉपी करणारे दोघे विमानतळावर जाळ्यात

IIT Farmagudi exam cheating: चित्रपटात मुन्नाभाईने वैद्यकीय परीक्षेत केलेल्या ‘जुगाडा’ची आठवण करून देणारा प्रकार फर्मागुढी येथील आयआयटीमध्ये घडला.
IIT Exam Cheating
IIT Exam CheatingDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

फोंडा: चित्रपटात मुन्नाभाईने वैद्यकीय परीक्षेत केलेल्या ‘जुगाडा’ची आठवण करून देणारा प्रकार फर्मागुढी येथील आयआयटीमध्ये घडला. भरभक्कम पगाराची नोकरी मिळवण्यासाठी दोन परीक्षार्थींनी ‘ब्लूटूथ’ उपकरणाचा वापर करून परीक्षा दिली. मात्र, त्यांचा हा डाव विमानतळावरील सुरक्षा तपासणीत उघड झाला. विशेष म्हणजे, त्यातील एकाने दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाने परीक्षा दिल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

अटक केलेल्यांची नावे राकेश दहोलिया (वय २९ वर्षे, रा. नवी दिल्ली) आणि अंकित सिंग (वय २३ वर्षे, रा. हरियाणा) अशी आहेत. या दोघांचा डाव विमानतळावरील तपासणीमुळे फसला

IIT Exam Cheating
Goa Crime: 11 वर्षे शौचालयाखाली दडले होते खुनाचे रहस्य; खोदकामात सांगाडा सापडला, अखेर पुराव्याअभावी संशयित निर्दोष

गलेलठ्ठ नोकरीसाठी ‘प्रताप’

फोंडा पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठीच हा प्रकार केल्याचे समोर आले. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१९ अंतर्गत गुन्हा नोंदवून दोघांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

IIT Exam Cheating
South Goa Crime Cases: दक्षिणेत 8 महिन्यांत 525 गुन्ह्यांचा छडा, खुनाच्या सर्व सहा प्रकरणांची उकल

भलत्याच व्यक्तीच्या नावाने परीक्षा

आयआयटीतील नोकरीसाठी दोन परीक्षार्थींनी ब्लूटूथचा आधार घेतला; पण दाबोळी विमानतळावरील सुरक्षा तपासणीत त्यांचा डाव उघड झाला. त्यातील एकाने दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाने परीक्षा दिल्याचेही समोर आले. चित्रपटातील मुन्नाभाईप्रमाणे शक्कल लढवण्याचा प्रयत्न अखेर महागात पडला. फोंडा पोलिसांनी दोघांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Vaibhavi IIT success story
Roy Naik Resignation Fonda
Gen Z Movement India
AI Wildlife protection System India
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com