57th IFFI Goa: इफ्फीचा 20 नोव्हेंबरपासून गोव्यात चित्रपटोत्सव; 86 देशांचे 159 आंतरराष्ट्रीय चित्रपट, आयोजनासाठी 30 कोटींचा खर्च

IFFI 2026 Film Festival: येत्या २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या महोत्सवाच्या आयोजनासाठी राज्य सरकार सुमारे ३० कोटी रुपये खर्च करत आहे.
IFFI 2026 Film Festival
57th IFFI GoaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) यंदा ८६ देशांतील १५९ आंतरराष्ट्रीय चित्रपट, ‘इंडियन पॅनोरमा’ विभागातील ४५ चित्रपट आणि १४ भव्य प्रीमियर रसिकांना पाहता येणार आहेत.

येत्या २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या महोत्सवाच्या आयोजनासाठी राज्य सरकार सुमारे ३० कोटी रुपये खर्च करत आहे. तसेच, गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली स्थानिक चित्रपट निर्मात्यांच्या अनुदानाची रक्कम लवकरच वितरित केली जाईल आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर गोव्यात भव्य फिल्म सिटी उभारली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी इफ्फीच्या कर्टन रेझर पत्रकार परिषदेत दिली.

IFFI 2026 Film Festival
Goa Politics: लक्ष्मीकांत पार्सेकरांसह भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची 'घरवापसी'; मुख्यमंत्री सावंतांचे मांद्रेत कमळ फुलवण्याचे आवाहन

यंदाच्या महोत्सवाची संकल्पना ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ (सीमारहित कथा) अशी आहे. चित्रपट हे भाषा आणि भौगोलिक सीमा ओलांडून संस्कृती व लोकांना जोडण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. हा महोत्सव केवळ पणजीपुरता मर्यादित न ठेवता सर्वसामान्य गोमंतकीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी पर्वरी, मडगाव आणि फोंडा येथेही चित्रपटांचे प्रदर्शन केले जाईल. विद्यार्थी आणि नवोदित चित्रपट निर्मात्यांसाठी १४ विशेष सत्रे आयोजित केली जातील.

या पत्रकार परिषदेला गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष दिलायला लोबो, माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार, अतिरिक्त सचिव प्रभा, ‘एनएफडीसी’चे अध्यक्ष जी. कृष्णकुमार, व्यवस्थापकीय संचालक धीरज सिंह, ‘पीआयबी’च्या महासंचालक (पश्चिम) स्मिता वत्स शर्मा, फीचर फिल्म ज्युरीचे अध्यक्ष मधुर भांडारकर आणि नॉन-फीचर फिल्म ज्युरी सदस्य हिमांशू शेखर खटाऊ व इतर मान्यवर उपस्थित होते.

सात हजार प्रतिनिधींची नोंदणी

‘इफ्फी’चे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर यांनी यंदाच्या महोत्सवात गोमंतकीय चित्रपट निर्मात्यांसाठी विशेष पॅकेज समाविष्ट करण्यात आल्याची घोषणा केली. ते म्हणाले, गेल्या दशकात अनेक गोमंतकीय चित्रपट निर्माते पुढे आले आहेत. कोकण पट्ट्यात पुरेशा चित्रपटगृहांचा अभाव असल्याने चित्रपट आणि प्रेक्षक यांच्यात मर्यादा येतात. अशा परिस्थितीत गोव्यात आंतरराष्ट्रीय महोत्सव भरवून स्थानिक निर्मात्यांना सन्मान देणे, ही संपूर्ण कोकण पट्ट्यातील चित्रपट निर्मात्यांसाठी मोठी प्रेरणादायी गोष्ट आहे. आतापर्यंत सात हजार प्रतिनिधींनी नोंदणी केल्याची माहितीही त्यांनी दिली.

IFFI 2026 Film Festival
Goa Winter Weather: गोव्यात थंडीची चाहूल! पणजीचे किमान तापमान 20 अंशांवर, पहाटे आणि रात्री गारवा; दुपारी मात्र उन्हाचा तडाखा कायम

स्पेन कंट्री ऑफ ऑनर

आंतरराष्ट्रीय व भारतीय विभागांसाठी यावर्षी १,४०० हून अधिक प्रवेशिका दाखल झाल्या होत्या. ‘इंडियन पॅनोरमा’ विभागासाठी आलेल्या ७६२ प्रवेशिकांमधून २५ फीचर फिल्म्स आणि २० अ-कथापट (नॉन-फीचर फिल्म्स) निवडण्यात आले आहेत. तसेच, यंदा स्पेन हा ‘कंट्री ऑफ ऑनर’ (सन्माननीय देश), तर रशिया हा ‘पार्टनर कंट्री’ (भागीदार देश) असणार आहे. याशिवाय, २१ ब्रिक्स देशांतील चित्रपटांचे विशेष पॅकेजही रसिकांना पाहता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.