Film Festival Goa 2023 : पणजी, राज्यात यंदाच्या ‘इफ्फी’च्या आयोजनाचे द्विदशकपूर्तीचे वर्ष आहे. मागील २० वर्षांपासून राज्यात इफ्फीचे आयोजन करण्यात येत आहे.
पंरतु दरवर्षी काहीना-काही कमतरता ही राहतेच. इफ्फीची कामे ही मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली असली तरीदेखील अजूनही तयारी अपुरीच आहे. राजधानी पणजीत इफ्फीच्या सुरवातीपासून जो उत्साहाचा माहोल तयार होतो तो यंदा दिसत नाही.
दिवजा सर्कल व गोवा मनोरंजन सोसायटी तसेच आयनॉक्स आवारात सजावटीचे काम अर्धवटच आहे. सजावटीसाठी तयार कलेल्या मयुराच्या कलाकृती, विविध सिनेतारकांचे बॅनर्स व इतर सामग्री आयनॉक्सच्या आवारात अस्ताव्यस्त पडलेली होती.
अपुऱ्या सजावटीमुळे तसेच अस्ताव्यस्त पडलेल्या साहित्यामुळे इफ्फी प्रतिनिधींना व्यत्यय निर्माण होत आहे. चित्रपटगृह तसेच इतर व्यवस्था पूर्ण झाल्या असल्या तरीदेखील ही अर्धवट सजावट कधी पूर्ण करणार, असा सवाल प्रतिनिधी उपस्थित करीत आहेत.
जुन्या गोमेकॉ इमारतीच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली आहे. अनेक प्रतिनिधी तेथे जाऊन फोटो काढतात; परंतु पुन्हा या इमारतीत प्रवेश करायचा तेथून या इमारतीत प्रवेश करण्यासाठी पायऱ्या केलेल्या नाहीत. जर इफ्फी प्रतिनिधींना आयनॉक्स परिसरात जायचे असेल तर या इमारतीच्या डाव्या बाजूला तयार करण्यात आलेल्या प्रवेशद्वारातून प्रवेश करावा लागत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.