IFFI Film Festival: इफ्फीत यंदा कोकणी चित्रपटांची मेजवानी! तब्बल 12 सिनेमांचे होणार विशेष प्रदर्शन

Konkani Films At IFFI: ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ संकल्पनेवर आधारित या महोत्सवात ८६ देशांतील १५९ आंतरराष्ट्रीय आणि १८ भाषांतील ७६ भारतीय चित्रपट दाखवले जाणार आहेत.
Konkani Films At IFFI
IFFI Film FestivalDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राजधानी पणजीत २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) तयारीचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा मनोरंजन संस्थेत (ईएसजी) आढावा घेतला. यंदाच्या महोत्सवात १२ कोकणी चित्रपटांचे विशेष प्रदर्शन करण्‍यात येणार आहे. तसेच राज्य सरकारच्या बहुप्रतीक्षित चित्रपट अर्थसाहाय्य योजनेचे पैसे उद्या मंगळवारी वितरित केले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ संकल्पनेवर आधारित या महोत्सवात ८६ देशांतील १५९ आंतरराष्ट्रीय आणि १८ भाषांतील ७६ भारतीय चित्रपट दाखवले जाणार आहेत. स्पेन हा ‘कंट्री ऑफ फोकस’, तर रशिया ‘पार्टनर कंट्री’ असेल. आतापर्यंत सहा हजारांहून अधिक प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. उद्‌घाटन आणि समारोप सोहळे अनुक्रमे २० आणि २८ नोव्हेंबर रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर होतील.

Konkani Films At IFFI
Goa New Taxi Rules: टॅक्सी व्यवसायाला मोठा धक्का! आता चालकासह कारही मिळणार भाड्याने; केंद्र सरकारचा नवा नियम

भारतीय पॅनोरमा विभागात २५ फिचर आणि २० नॉन-फिचर चित्रपट दाखवले जातील. उद्‌घाटनासाठी ‘धुरंधर’ आणि ‘बिकमिंग’ या चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. ब्रिक्स सिनेमांतर्गत ‘रामायण’ हा उद्‌घाटनाचा चित्रपट विशेष आकर्षण असेल. याशिवाय ५२ महिला चित्रपटकर्त्या, ६२ पदार्पण करणारे दिग्दर्शक आणि ‘क्रिएटिव्ह माईंड्स ऑफ टुमारो’मधील १०० निवडक सहभागी महोत्सवात सहभागी होतील. ‘वेव्ह्ज फिल्म बाजार’च्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातील सहनिर्मिती आणि व्यावसायिक सहकार्याला प्रोत्साहन दिले जाणार आहे.

प्रमुख कार्यक्रमांसाठी पास आधारित प्रवेश व्यवस्था असेल. उद्‌घाटन, समारोप, मास्टरक्लास आणि निवडक कार्यक्रमांसाठी पास आवश्यक असतील. नोंदणीकृत प्रतिनिधींना नियमानुसार चित्रपट प्रदर्शनांना विनामूल्य प्रवेश मिळेल. मात्र, खुल्या जागेतील चित्रपट प्रदर्शन आणि सार्वजनिक उपक्रम सर्वांसाठी विनापास खुले असतील.

कोकणी चित्रपट

१. आन्‍सेसांव

२. पूर्णत:

३. उमेश

४. शकुंतला

५. मीडिअम पीस

६. वुडवर्म (रोटो)

७. नॉईज्‌

८. दर्या

९. चिअर्स

१०. पर्फेक्ट शॉट

११. बापो काळे

१२. हेल्थ सेंटर

Konkani Films At IFFI
Goa Politics: मांद्रेत आरोलकरांना मुख्यमंत्र्यांकडून बळ, विकासकामांचं केलं तोंडभरुन कौतुक; 2027 मध्ये जीत पुन्हा विक्रमी मतांनी निवडून येतील

परेड, रोमटामेळ अन् आकाशकंदील स्पर्धा

२५ नोव्हेंबर रोजी ‘सेलिब्रेटिंग द जॉय ऑफ सिनेमा’ या संकल्पनेवर आधारित ईएसजी ते कला अकादमी अशी भव्य परेड काढण्यात येणार आहे. २३, २४, २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी मांडवी किनाऱ्यावरील मंचावर रोमटामेळ व सांस्कृतिक कार्यक्रम होतील. २५ रोजी ‘मोरपीस’ संकल्पनेवर आकाशकंदील स्पर्धा आयोजित केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Konkani Language
IFFI 2026 Film Festival
IFFI Film Technology Startups
Global Konkani Music Convention | Goa News