IFFI 2024: In Conversation मध्ये दिग्गजांची मांदियाळी! रेहमान, मणीरत्नम, रणबीरसोबत खुला संवाद

In Conversation Sessions In IFFI 2024: ५५ व्याभारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त (इफ्फी) कला अकादमीमध्ये होणाऱ्या ''इन कन्वर्सेशन'' या मुलाखतवजा चर्चात्मक कार्यक्रमात भारतीय फिल्म उद्योगातील दिग्गजांना, वेगवेगळ्या विषयांवर मनमोकळेपणे आपली मते मांडताना ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
Ranbir Kapoor, A R Rehman in IFFI
Ranbir Kapoor, A R Rehman Dainik Gomantak
Published on
Updated on

IFFI 2024 to Host In Conversation Sessions

पणजी: ५५ व्याभारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त (इफ्फी) कला अकादमीमध्ये होणाऱ्या ''इन कन्वर्सेशन'' या मुलाखतवजा चर्चात्मक कार्यक्रमात भारतीय फिल्म उद्योगातील दिग्गजांना, वेगवेगळ्या विषयांवर मनमोकळेपणे आपली मते मांडताना ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

२२ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ४.३० ते ६ या वेळेत ''ट्रान्सफॉर्मिंग लिटररी मास्टरपिसेस इंटू एंगेजिंग फिल्म'' (उत्कृष्ट साहित्यकृतींचे रूपांतर खिळवून ठेवणाऱ्या चित्रपटांमध्ये करणे) या विषयावर गौतम वासुदेव मेनन (सिनेमा दिग्दर्शक, पटकथाकार, निर्माते आणि अभिनेते) प्रख्यात भारतीय फिल्म दिग्दर्शक निर्माते आणि पटकथाकार मणीरत्नम यांच्याशी संवाद साधतील.

२३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत खुशबू सुंदर (अभिनेत्री आणि राजकारणी) शिवकार्तिकेयन (अभिनेते, पार्श्वगायक, गीतकार आणि चित्रपट निर्माते) यांची मुलाखत घेतील. या मुलाखतीचा विषय आहे, ''फ्रॉम स्मॉल स्क्रीन टू बिग स्क्रीन : द इन्स्पायरिंग जर्नी ऑफ शिवकार्तिकेयन‌'' (छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत : शिवकार्तीकेयन यांचा प्रेरणादायी प्रवास)

याशिवाय एक विशेष पॅनेल चर्चेचा कार्यक्रम कला अकादमीच्या सभागृहात सकाळी ११ ते १२ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. ''विल आर्टिफिशियल इंटेलिजन्स अल्टर फिल्म मेकिंग फोरेव्हर?'' (कृत्रिम बुद्धिमत्ता सिनेमा निर्मितीच्या प्रक्रियेत बदल घडवून आणेल काय?) या विषयावरच्या चर्चेत आनंद गांधी, प्रज्ञा मिश्रा आणि शेखर कपूर भाग घेणार आहेत. कला अकादमी आयोजित करण्यात आलेले हे कार्यक्रम सर्व प्रतिनिधींना खुले आहेत.

ए. आर. रेहमान यांच्यासोबत बातचीत

२७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी २.३० ते ४ या वेळेत ए. आर. रेहमान (प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक, गायक) यांच्यासोबत बातचीत करणार आहेत नमन रामचंद्रन (आंतरराष्ट्रीय पत्रकार). लता मंगेशकर मेमोरिअल टॉक मधील या कार्यक्रमाचा विषय ''म्युझिकल थिएटर इन इंडिया'' असा आहे.

Ranbir Kapoor, A R Rehman in IFFI
IFFI 2024: इफ्फीत काय आणि कुठे पाहाल? संपूर्ण माहिती घ्या एका क्लिकवर..

रणबीर कपूरशी संवाद

२४ नोव्हेंबर रोजी राज कपूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त होणाऱ्या ''सेन्टेनरी स्पेशल''मध्ये राहुल रवैल (चित्रपट दिग्दर्शक आणि संकलक) हे राज कपूर यांचे नातू आणि प्रसिद्ध अभिनेते रणबीर कपूर यांच्याशी संवाद साधून राज कपूर‌ या विख्यात व्यक्तिमत्त्वाविषयी विशेष गोष्टी जाणून घेतील. ''सेलिब्रेटिंग द लाइफ अँड वर्क्स ऑफ राज कपूर- द ग्रेटेस्ट शोमॅन'' (थोर शोमॅन राज कपूर यांचे जीवन आणि कार्याचे साजरीकरण) या विषयावरील हा कार्यक्रम संध्याकाळी २.३० ते ४ या काळात होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com