Illegal Construction: सांतिनेजमधील ‘वाय’ मार्गावरील हमारा स्कूलजवळ कोणतीही परवानगी न घेता बांधकामावर कारवाई करण्यास महापालिकेने आज सुरवात केली आहे. आयुक्त क्लेन मेदेरा यांनी मिठाईच्या दुकानमालकाने लावलेले ॲक्रेलिकचे फलक दुपारी हटविण्यात आले.
दरम्यान, ते बांधकाम बेकायदेशीर असल्यास हटविले जाईल, असे आश्वासन महापौर रोहित मोन्सेरात यांनी महापालिकेची बैठक झाल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर दिले.
सांतिनेजमधील हमारा स्कूलजवळील जागा रस्ता रूंदीकरणात गेलेली असताना आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचा ताबा असतानाही तेथे व्यवसाय करणाऱ्या बार (तावेर्न) मालकाने दुकान दुरुस्तीच्या नावाखाली नव्याने दुकानगाळे उभारले.
दुकान दुरुस्तीसाठी महानगरपालिकेचीही त्याला परवानगी घेण्यात आलेली नाही. तरीही हे काम त्या दुकानदाराने रेटून नेले. जून २०२३ पासून त्याने कामाला हळूहळू सुरुवात केली. अखेर सप्टेंबरमध्ये थेट दुकानगाळा मिठाई विक्रेत्याला भाड्याने दिला गेला आणि मिठाई विक्रेत्याने तिथे दुकान सुरू करण्यासाठी हालचालीही सुरू केल्या.
तत्पूर्वी दुकानमालकाने आपल्या जुन्या कागदपत्रांच्या आधारे महानगरपालिकेकडे व्यवसाय परवान्यासाठी अर्ज केला. या सर्व घटनांवर दै. ‘गोमन्तक’ने जूनपासून प्रकाश टाकला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.