सावित्री जिंकल्या तर भाजपमध्‍ये येणार? बाबू कवळेकरांनी दिल 'हे' उत्तर

विजयाची डबल हॅट्‌ट्रिक करणार; बाबू कवळेकर
Babu Kavalekar
Babu KavalekarDainik Gomantak

काँग्रेसमध्ये असतानाचे आपले जुने कार्यकर्ते आणि आता भाजपमध्‍ये दाखल झाल्यानंतर मिळालेले मूळ भाजप कार्यकर्ते हे सर्वजण माझ्‍या विजयासाठी वावरत आहेत. तसेच ही आपली सहावी विधानसभा निवडणूक असल्याने डबल हॅट्‌ट्रिकचा प्रयत्न असेल. केपे मतदारसंघात आपल्‍याला उदंड प्रतिसाद मिळत असल्‍यामुळे विजय निश्‍चित आहे, असा विश्‍‍वास उपमुख्यमंत्री तथा केपे मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर (Babu Kavalekar) यांनी ‘गोमन्तक’ला दिलेल्‍या मुलाखतीत व्‍यक्त केला.

विजयाची डबल हॅट्‌ट्रिक करणार

बाबू कवळेकर : केपेत विजय नक्की, भाजपमध्‍ये आल्‍यावर कार्यकर्त्यांच्‍या संख्‍येत वाढ

या विधानसभा निवडणुकीत आपल्यासमोर कोणती आव्हाने आहेत?

मला तशी मोठी आव्हाने कोणतीच नाहीत. कारण काही काळापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये आमच्या उमेदवारांनी चांगले यश मिळवले होते. त्यामुळे भाजपचा (BJP) उमेदवार म्हणून पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत असलो तरी मोठा फरक पडणार नाही. ही माझी एकूण सहावी विधानसभा निवडणूक असून माझा हा डबल हॅट्‌ट्रिकचा प्रयत्न असेल. पूर्वीपेक्षाही यावेळी मला दुप्पट पाठिंबा मिळत आहे. लोक विविध ठिकाणी मोठ्या सख्येने माझ्या प्रचारात सहभागी होत आहेत.

भाजपमध्‍ये प्रवेश केल्यानंतर तुमची ही पहिली विधानसभा निवडणूक. (Assembly Election) त्याबद्दल काय सांगणार?

त्यात काही विशेष नाही. कारण भाजपमध्‍ये आल्यानंतर आम्ही जिल्हा पंचायत निवडणुकीत चार जागा मिळवल्या आहेत.

भाजपमध्‍ये दाखल झाल्‍यानंतर कार्यकर्त्यांची संख्‍या वाढली?

आमच्या कार्यकर्त्यांची टीम पूर्वीप्रमाणेच आहे. कार्यकर्त्यांची संख्या दुप्पट झाली आहे. माझ्याबरोबर गेली 22-23 वर्षे काम करणारे माझे जुने कार्यकर्ते आजही माझ्यासोबत आहेत. तर आता मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांची त्यात भर पडली आहे. हे सर्वजण मिळून एकसंधपणे माझ्यासाठी काम करत आहेत. भाजप प्रवेशाआधी विरोधात असल्याने मतदारसंघातील विकास रखडला होता. मात्र सत्तेत आल्यानंतर अनेक कामांना हात घातला आहे. विशेषतः कृषी क्षेत्रात विविध योजना राबविल्या आहेत. मतदारसंघात बेरोजगारीची समस्या आहे. त्यावर मात करण्यासाठी पुन्हा निवडून आल्यानंतर खासगी उद्योगांचीही मदत घेणार आहे.

Babu Kavalekar
जनतेच्या आशीर्वादाने ही लढाई जिंकेन; सावित्री कवळेकर

कृषी (Agriculture) क्षेत्रात कोणती कामे केली आहेत?

या क्षेत्रात आम्ही काही ठोस पावले टाकली आहेत. चांगल्या योजना सादर केल्या आहेत. शेतकऱ्यांना विचारात घेऊन या योजना आखण्यात आल्या आहेत. सामुदायिक शेती, शेतकऱ्यांना सबसिडी या द्वारे राज्याला पुन्हा एकदा शेतप्रधान बनविण्याचा हेतू आहे. पूर्वी गोवा शेतीप्रधान राज्य होते. कालांतराने शेतीकडे दुर्लक्ष झाले. परंतु आता लोकांनी पुन्हा शेतीकडे यासाठी आमचे प्रयत्न असतील.

तुमची पत्नी निवडणूक लढवत आहे. त्या जिंकतील काय?

मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. पक्ष जो आदेश देईल ते मी करीन. पक्षाबद्दल विचारा.

सावित्री कवळेकर जिंकल्या तर भाजपमध्‍ये येणार काय?

या प्रश्‍नावर थेट उत्तर त्यांनी टाळले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com