जनतेच्या आशीर्वादाने ही लढाई जिंकेन; सावित्री कवळेकर

सांगेचा विकास केला असेल तर मग अद्यापही पाणी समस्या, नेटवर्क, रोजगार, नोकऱ्या, आरोग्य सेवा या समस्या लोकांना का भेडसावत आहेत? सावित्री कवळेकरांचा सवाल
Savitri Kavalekar
Savitri KavalekarDainik Gomantak 
Published on
Updated on

सांगे : सांगे मतदारसंघातील जनतेने गेल्या पाच वर्षांत आपल्याला भरभरून प्रेम दिले. आपले कार्यही लोकांनी पाहिले आहे. त्‍यामुळे आता निवडणुकीच्‍या निमित्ताने प्रचारासाठी लोकांच्‍या दारात गेल्यानंतर होणारे भव्‍य स्वागत असेल किंवा खेड्यापाड्यात मिळत असलेल्‍या उदंड प्रतिसाद पाहता आपला विजय हा काळ्‍या दगडावरची रेघ आहे. आता फक्त लढाई आहे ती अधिकाधिक मताधिक्‍क्य प्राप्त करण्यासाठी. जनतेच्या आशीर्वादाने ही लढाईही जिंकेन, असा आत्मविश्वास अपक्ष उमेदवार सावित्री कवळेकर (Savitri Kavalekar) यांनी व्‍यक्त केला.

कोंगारे-भाटी येथील कोपरा बैठकीत सावित्री बोलत होत्‍या. यावेळी व्यासपीठावर चंदन उनंदकर, नवनाथ नाईक, चंद्रकांत गावकर, नानू भांडोळकर, चांगुणा साळगावकर, माजी उपसरपंच आर्यकुमार जांबवलीकर, जानू झोरे, कुष्ठ गावकर आणि प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्‍थिती होती.

Savitri Kavalekar
भाजपमुळं प्रत्येक नागरिकाचे जीवन असह्य झालं; दिगंबर कामत

सांगेचा (Sanguem) विकास केला असेल तर मग अद्यापही पाणी समस्या, नेटवर्क, रोजगार, नोकऱ्या, आरोग्य सेवा या समस्या लोकांना का भेडसावत आहेत? सांगे टँकरमुक्त का झाला नाही? असे प्रश्‍‍न सावित्री यांनी यावेळी उपस्‍थित केले. तसेच ज्यांनी लोकांना फसविले, त्यांना या निवडणुकीत (Election) लोकच फसविणार असल्याचे सांगून आपल्या ‘कपाट’ या निशाणीवर शिक्का मारून बहुसंख्‍य मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.

Savitri Kavalekar
प्रमोद सावंत भाषणाच्या सुरुवातीलाचं झाले भावनाविवश

चंदन उनंदकर म्हणाले की, आम्ही सर्वांना संधी दिली. पण काहींना त्या संधीचे सोने न करता माती केली. म्हणूनच सांगेतील जनता यावेळी महिला लोकप्रतिनिधी म्हणून सावित्री कवळेकर यांना आपल्या पाठिंबा देऊ लागली आहे. विरोधक अफवा निर्माण करतात. त्यांच्यावर विश्‍‍वास ठेवू नका.

यावेळी आर्यकुमार जांबावलीकर, महेश गावकर, नवनाथ नाईक यांनीही सावित्री कवळेकर निवडून येणार असल्याचा दावा केला. मनोज पर्येकर यांनी सूत्रसंचालन केले तर त्‍यांनीच स्‍वागत करून शेवटी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com